Share

खवड्या डोंगर मृत्यू प्रकरण: ‘कुणालला आत्महत्या करायची नव्हती तर…’, मावशीच्या दाव्याने प्रकरणाला नवा ट्विस्ट

खवड्या डोंगरावर पडून तीन जणांचा मृत्यू झालेल्या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. कुणालला आत्महत्या करायची नव्हती, तर आई-वडिलांना एकत्र आणायचं होतं, असा दावा मावशीने केला आहे.

Published On: 

Khavdya Mountain Chhatrapati Sambhajinagar family death case investigation and new twist

छत्रपती संभाजीनगर: खवड्या डोंगरावर मुलाला वाचवताना आई-वडिलांचाही जीव गेल्याची बातमी (Khavdya Mountain Case) ऐकून महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण आता यात एक असा ट्विस्ट आलाय, जो ऐकून तुम्हीही थक्क व्हाल.

२१ ऑगस्टला कुणाल चांदवडे, त्याचे वडील मुरलीधर आणि आई संगीता या तिघांचा डोंगरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला. पोलिसांनी सुरुवातीला याला आत्महत्या आणि अपघाताचं रूप दिलं होतं. पण आता कुणालची मावशी कल्याणी परडे यांनी यावर एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, कुणाल तिथे जीव द्यायला गेलाच नव्हता.

खवड्या डोंगर मृत्यू प्रकरण आणि मावशीचा खळबळजनक दावा

हा सगळा प्रकार एका तुटलेल्या कुटुंबाला जोडण्याच्या प्रयत्नातून घडला आहे. कुणालचे वडील काही कारणांमुळे घर सोडून गेले होते. आई आणि वडिलांमध्ये प्रचंड दुरावा होता. त्यामुळे कुणाल आतून पूर्णपणे खचला होता. आई-वडिलांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी आणि वडिलांना भावनिक करण्यासाठीच तो खवड्या डोंगरावर गेला होता, असं मावशीने म्हटलंय.

घरात पैशांची किंवा महागड्या मोबाईलची कोणतीही अडचण नव्हती. दाजींकडे शेती होती आणि ते चांगल्या घरचे होते, असं कल्याणी यांनी स्पष्ट केलं. दुसरीकडे, सासरच्या लोकांविषयी मनातली खदखद मांडण्यासाठीच संगीता यांनी यूट्यूबचा आधार घेतला होता. कारण पतीसोबत त्यांचा कसलाच संवाद उरला नव्हता. कुणालने काही दिवसांपूर्वीच वडिलांना फोन करून ‘मला सोडून जाऊ नका’ अशी विनवणी केली होती.

२०२५ मध्येही कुणाल असाच रागाच्या भरात या डोंगरावर गेला होता. पण तेव्हा तो फक्त फिरायला गेला होता, जीव द्यायला नाही. यावेळीही त्याला फक्त आई-वडिलांना एकत्र आणायचं होतं. पण दुर्दैवाने त्याचा तोल गेला आणि या भावनिक प्रयत्नात संपूर्ण कुटुंबाचाच अंत झाला. आता या नव्या दाव्यानंतर पोलीस तपासाला कोणती दिशा मिळते, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही