Rupali Chakankar vs Dipali Sayyad: अभिनेत्री आणि शिंदे गटाच्या नेत्या दिपाली सय्यद यांनी थेट रुपाली चाकणकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. “चाकणकर मला सातत्याने मानसिक त्रास देत आहेत. एवढंच नाही, तर माझा नवा चित्रपट रोखण्यासाठी त्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरही मोठा दबाव आणत आहेत,” असा खळबळजनक गौप्यस्फोट सय्यद यांनी केलाय.
Maharashtra Epstein Files: दिपाली सय्यद यांचा ५०० कोटींचा दावा
नेमकं प्रकरण काय?
दिपाली सय्यद यांचा ‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ हा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटातील एक मुख्य पात्र रुपाली चाकणकर यांच्यावर आधारित असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. याच पार्श्वभूमीवर चाकणकरांनी नुकताच १९ जणांवर गुन्हा दाखल करत थेट २५ कोटींचा मानहानीचा दावा ठोकला होता.
यावर आता दिपाली सय्यद यांनी सडेतोड आणि आक्रमक उत्तर दिलंय. “आमच्या चित्रपटात कुठेही चाकणकरांचं नाव नाही. त्या स्वतःहून हा विषय स्वतःच्या अंगावर ओढवून घेत आहेत,” असं सय्यद म्हणाल्या. त्यामुळेच जशास तसं उत्तर देत, सय्यद यांनी चाकणकरांवर चक्क ५०० कोटींचा उलटा दावा ठोकून सर्वांनाच धक्का दिला आहे.
दुसरीकडे, आपली बाजू मांडताना सय्यद चांगल्याच संतापलेल्या दिसल्या. “मी सोशल मीडियावर कुठलीही अश्लील पोस्ट केलेली नाही. मी एक कलाकार आहे. माझा उदरनिर्वाह याच चित्रपटावर आहे. तरीही राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा मला अशा प्रकारे ‘मेंटली टॉर्चर’ करत आहेत. त्यांनी माझी बदनामी केलीय,” असा संताप त्यांनी व्यक्त केला.
हा चित्रपट कुणाचीही बायोग्राफी नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक यात मांडण्यात आला आहे. त्यामुळे कितीही अडचणी आल्या आणि कुणी कितीही दबाव आणला, तरी २ ऑक्टोबरला चित्रपट प्रदर्शित होणारच, असा ठाम विश्वास दिपाली सय्यद यांनी व्यक्त केलाय. त्यामुळे आता हा वाद पुढे कोणतं वळण घेणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- MPSC पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांनी घेतली राज ठाकरेंची भेट; फेरपरीक्षेची केली मागणी
- रक्षाबंधनाला भावासाठी राखी घेताय? बाजारातील ‘ही’ चूक टाळा, शास्त्र काय सांगतंय पाहा…
- ‘रामगिरी महाराजांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही’; फडणवीसांचा धमकी देणाऱ्यांना इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











