मुंबई : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांची नावे बदलण्यात आली आहेत. उदाहरणार्थ, औरंगाबादचे नाव बदलून ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबादचे नाव बदलून ‘धाराशिव’ करण्यात आले. काही शहरांची नावेही बदलण्यात आली.
ठाणे जिल्ह्यातील उपनगर असलेल्या मुंब्राचे नाव बदलून ‘मुंब्रादेवी’ करण्याबाबत काही काळापासून चर्चा सुरू आहे. या विषयावर आता भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी भाष्य केले आहे.
‘तिरंगा यात्रा’मध्ये सहभागी झाल्यानंतर रत्नागिरी येथे बोलताना ते म्हणाले की, “पहिले आपण सगळे हिंदूच होतो, परत हिंदूमय करण्याचे काम आम्ही लोक करत आहोत.”
Nitesh Rane on Mumbra renaming
विविध राजकीय आणि सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करताना त्यांनी महाविकास आघाडी (MVA) तसेच काही प्रशासकीय अधिकाऱ्यांवर कडक टीका केली. पृथ्वीराज चव्हाण आणि संजय राऊत यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरही राणे यांनी आक्रमक भूमिका घेतली.
मुंब्राच्या नामकरणाबाबत बोलताना नितेश राणे यांनी संकेत दिले की, लवकरच नवीन नावाची घोषणा केली जाईल. “पहिले आपण सगळे हिंदूच होतो. पुन्हा हिंदूमय करण्याचे काम आम्ही करत आहोत.” इस्लामपूरचे ईश्वरपूर असे नामकरण करण्यात आलं ना, मग मुंब्र्याचे मुंब्रादेवी असे नामकरण का होऊ नये, परिणामी, मुंब्राच्या नामकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.
जात पडताळणी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून नितेश राणे यांनी काही प्रशासकीय अधिकाऱ्यांना थेट लक्ष्य केले. विभागात काही “सडके आंबे” असल्याचा आरोप त्यांनी केला. काही अधिकारी चुकीची प्रमाणपत्रे देतात आणि त्यांच्या वागणुकीमुळे सरकारची बदनामी होते, असे ते म्हणाले.
मराठा समाजाचे आंदोलक मनोज जरांगे यांनी उपस्थित केलेला मुद्दा योग्य होता, चुकीचा नव्हता, असेही राणे यांनी स्पष्ट केले. जात पडताळणी प्रक्रियेदरम्यान काही मराठा तरुणांना डावलले जाण्याच्या मुद्द्याला त्यांनी गंभीर बाब असल्याचे म्हटले.
मात्र, या प्रकरणासाठी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना जबाबदार धरणे अयोग्य आहे. काही कनिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या चुकांमुळे ही घटना घडल्याचा दावा नितेश राणे यांनी केला.
पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर थेट टीका
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरही नितेश राणे यांनी टीका केली. काँग्रेस पक्षाच्या सध्याच्या राजकीय दुरवस्थेला चव्हाण पूर्णपणे जबाबदार आहे. चव्हाण यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात काँग्रेसला मोठे फटके बसले आणि त्यामुळेच पक्ष आजही विरोधी पक्षात आहे. शिवाय, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार पृथ्वीराज चव्हाण यांनी गमावला आहे, असे प्रतिपादन राणे यांनी केले.
संजय राऊत यांच्यावर टीका
यावेळी निवडणूक आयोगाबाबत संजय राऊत यांनी केलेल्या विधानांवरही नितेश राणे यांनी आक्षेप घेतला.“हा काय तिथे चहा पाजायला होता का?” असा सवाल याने यांनी केला. देश हा संविधान, कायदे आणि नियमांच्या आधारे चालतो आणि भारत हा लोकशाहीसाठी कटिबद्ध असलेला देश आहे, यावर नितेश राणे यांनी भर दिला.
📌 महत्वाच्या बातम्या
- Pratap Sarnaik vs Kailas Patil: ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील ‘ऑपरेशन टायगर’च्या रडारवर? सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ
- ‘2047 पर्यंत भारत विकसित होणारच’; लाल किल्ल्यावरून PM मोदींचा मोठा संकल्प
- शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे? कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची नवी डेडलाईन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











