Share

शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार पैसे? कृषिमंत्र्यांनी सांगितली कर्जमाफीची नवी डेडलाईन

कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी कर्जमाफीबाबत नवी अपडेट दिली असून, पुढील २ ते ४ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील असा दावा केला आहे.

Published On: 

Agriculture Minister Dattatray Bharne on farmer loan waiver

कर्जमाफीची घोषणा झाली, पण प्रत्यक्ष खात्यात पैसे कधी येणार? हाच प्रश्न सध्या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना सतावतोय. ‘तारीख पे तारीख’ मिळत असल्याने बळीराजा चांगलाच चिंतेत आहे.

आता मात्र राज्य सरकारने यावर मोठा खुलासा केलाय. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे. पुढील दोन ते चार दिवसांत पाच ते दहा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात थेट जमा होतील, असा मोठा दावा त्यांनी वाशिममध्ये केलाय.

कर्जमाफीची प्रक्रिया कुठपर्यंत? Dattatray Bharne यांनी स्पष्टच सांगितलं

भरणे यांच्या माहितीनुसार, सध्या ‘ॲग्रीस्टॅक’च्या माध्यमातून याद्यांची जोरदार पडताळणी सुरू आहे. शासनाकडे पैशांची कोणतीही कमतरता नाही. त्यामुळे जशी यादी अद्ययावत (अपडेट) होईल, तसतसे पैसे थेट खात्यात पडतील. विशेष म्हणजे, या कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांना तब्बल ४० हजार ५८५ कोटी रुपयांचा मोठा लाभ होणार आहे.

दुसरीकडे, शहरी भागातील शेतकऱ्यांचाही एक मोठा प्रश्न आहे. त्यांना सिंचन विहीर आणि इतर योजनांचा लाभ मिळत नाही. पत्रकारांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यावर, भरणे यांनी मोकळेपणाने कबुली दिली. याबाबत आपल्याला कल्पना नव्हती, मात्र लवकरच या शेतकऱ्यांसाठीही तरतूद केली जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलंय.

सातबारा उताऱ्यावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांसाठीही एक मोठी गुड न्यूज आहे. ज्या शेतकऱ्यांची नावे रेकॉर्डवर नाहीत, त्यांना तातडीने रेकॉर्डवर आणण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. यामुळे तब्बल २ लाख ३१ हजार शेतकऱ्यांना ‘ॲग्रीस्टॅक’ आणि कर्जमाफीचा मार्ग मोकळा होणार आहे. यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना १५ दिवसांत अहवाल देण्याचे कडक आदेशही बावनकुळे यांनी दिले आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

 

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही