दिल्ली : गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या राजीनामाची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. यावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांवर (Opposition) निशाणा साधला आहे. विरोधकांचे फक्त राजकारण सुरू आहे, त्यांना संसदेत चर्चा करायची नाही आहे. त्यांना फक्त बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे. विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचे खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचे नाटक करायचे आहे, असा सवाल शिंदे यांनी केला आहे.
एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांची भेट घेतली आणि विविध विषयांवर सुमारे २० मिनिटे चर्चा केली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली.
जंतरमंतर येथील आंदोलनादरम्यान विद्यार्थी आणि निदर्शकांविरुद्ध ‘पेलेट गन्स’चा वापर केल्याच्या आरोपांमुळे संसदेतील तणाव वाढला आहे. या मुद्द्यावर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून गृहमंत्री अमित शाह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
Eknath Shinde criticize opposition on Parliament discussion
जंतर-मंतर येथील गोळीबाराच्या घटनेबाबत आपली भूमिका संसदेत मांडण्यासाठी सरकार सज्ज असून, गृहमंत्री अमित शहा या विषयावर निवेदन करणार आहेत. मात्र, याला विरोध होत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी ‘आम्हाला शाह यांचे भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही, त्यांचे लेक्चर ऐकायचे नाहीये, असे म्हणत अमित शहांनी राजीनामा द्यावा, असे म्हटले आहे.
या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली आणि त्यांना केवळ राजकारण करण्यातच रस असल्याचे म्हटले. “जनतेला सर्वांच काम माहीत आहे. पंतप्रधान मोदींचे काम देशाने पाहिले, अमित शाह यांचंकामही जनतेला माहीत आहे. त्यामुळेच मी फक्त एवढंच म्हणेन की देशातील140 कोटींची जनता मोदीजींसोबत आहे.” असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पुढे शिंदे म्हणाले की, “जे युवक आहेत, तरूण पिढी आहे, ते देशांचं भविष्य आहे. मोदीजींनी पटापाट निर्णय घेतले, कठोर कायद्याची तरतूद केली. 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटींचा दंड, फास्ट ट्रॅकमध्ये केस अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या ना. अजून काय करायला पाहिजे ? असा सवाल शिंदे यांनी विचारला.
“त्यामुळेच राजकारण करण्याचं विरोधकांचे दुकान बंद झाले, म्हणूनच विरोधकांना संसदेतील चर्चेत रस नाही, तर त्यांना बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे,” असा घणाघाती हल्ला शिंदे यांनी चढवला.
विरोधकांना राजीनाम्याच्या मागणीशिवाय दुसरं काय येतं ? आधी त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला, आंदोलकांची ही मागणी मान्य करून शिक्षणमंत्री प्रधानांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सोपवला. पण विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचं खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचं नाटक करायचं आहे, असा सवालही शिंदे यांनी विचारला.
“राहुल गांधी नेहमी परदेशात जाऊन देशांची, पंतप्रधान मोदींची बदनामी करतात. विरोधी पक्षनेत्याने अत्यंत गंभीरपणे आपली जबाबदारी निभावली पाहिजे, असे पार्ट-टाईम राजकारण करून चालत नाहीत,” असा टोला शिंदे यांनी लगावला.
📌 महत्वाच्या बातम्या
- जंतर-मंतर आंदोलनाचा ‘सीझन २’ लवकरच…; अभिजीत दिपकेंची मोठी घोषणा
- बटर चिकन’मध्ये खरंच बटर होतं का? फेमस ‘हॉटेल अमरप्रीत’वर FDA चा छापा; जागेवरच लायसन्स रद्द
- संदीपान भुमरेंचे अमित शाहांना साकडे; छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












