Share

‘रस्त्यावर नव्हे, संसदेत चर्चा करा’; CM फडणवीसांचे राहुल गांधींना थेट आव्हान

NEET पेपरफुटी प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि विरोधी पक्षांना संसदेत चर्चा करण्याचे आव्हान देत आंदोलनाऐवजी संवादातून तोडगा काढण्याचे आवाहन केले.

Published On: 

CM Fadnavis

दिल्ली : नीट (NEET) पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनांमुळे राजकीय तणाव वाढतच चालला आहे. या प्रकरणावरून काँग्रेस (Congress) आणि विरोधी पक्षांनी (Opposition Party) मोदी सरकारला (Modi Govt) कोंडीत पकडले आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे मोदी सरकार बॅकफूटवर आले आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. संसदेतही या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये खडाजंगी पाहायला मिळत आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि विरोधी पक्षांना संसदेत NEET पेपरफुटीबाबत चर्चा करण्याचे आव्हान (Challenge) दिले आहे. फडणवीस यांच्या या आव्हानामुळे राजकीय वर्तुळात आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना विरोधी पक्षांवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “राहुल गांधींनी आपली टाळाटाळ करण्याची वृत्ती सोडून संसदेत चर्चा करावी. लोकशाहीत निर्णय रस्त्यावर नाही, तर संसदेत घेतले जातात. जर तुमचा देशाच्या संविधानावर विश्वास असेल, तर या विषयावर संसदेत चर्चा करा. तुम्हाला उत्तरे हवी असतील, तर ती संसदेत मागा. तुमच्याकडे काही कल्पना असतील, तर सरकारला त्या अंमलात आणण्यास भाग पाडा. आंदोलनांतून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न थांबवा. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय संवादातूनच घेतले जातील.”

“मोदीजींनी विद्यार्थ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पेपरफुटीच्या आरोपांमध्ये सहभागी असलेल्यांना शिक्षा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मला विश्वास आहे की मोदीजींनी या संपूर्ण प्रकरणावर कठोर भूमिका घेतली आहे. NEET परीक्षा अडथळ्याशिवाय पार पडली. विद्यार्थी आपल्या यशाचा आनंद साजरा करत आहेत. भविष्यातील परीक्षाही अशाच प्रकारे पार पडाव्यात यासाठी चर्चा होणे आवश्यक आहे. यूपीए सरकारच्या काळात बजेट ८,००० कोटी रुपये होते. ते आता १.३९ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आले आहे. प्रतिष्ठित संस्थांमधील जागा वाढवण्यात आल्या आहेत, ज्यामुळे विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण झाल्या आहेत.” असेही मुख्यमंत्री माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले.

पुढे ते म्हणाले की, “विरोधी पक्षांना यावर चर्चा करायची नाही. कर्नाटक, तेलंगणा आणि पंजाबमध्येही पेपरफुटीच्या घटना घडल्या होत्या, त्या घटनांसाठी अनुक्रमे काँग्रेस आणि ‘आप’ (AAP) यांना उत्तर द्यावे लागेल.” त्यांच्या प्रत्येक परीक्षेत अनियमितता झाल्या आहेत. त्यांचे घोटाळे उघडकीस येतील. त्यांना संसदेत यावर चर्चा करायची आहे. हे सर्व गोंधळ निर्माण करण्यासाठी केले जात आहे. राज्याचा टीईटी (TET) घोटाळा ठाकरे सरकारच्या काळात झाला होता आणि त्यांच्या मंत्र्यांवर अनेक आरोप झाले होते. परीक्षेचे पेपर फुटले होते आणि प्रत्यक्षात नापास झालेल्या उमेदवारांना उत्तीर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला, असा दावा करत फडणवीस यांनी गंभीर आरोप केले.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही