🕒 1 min read
शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार, हा प्रश्न तुम्हालाही पडलाय का? ३० जून आणि ५ जुलैचा मुहूर्त टळल्यानंतर आता थेट ऑगस्टची तारीख चर्चेत आली आहे. त्यामुळे बळीराजाच्या जीवाला घोर लागला आहे.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कर्जमाफीच्या निकषात मोठा बदल केला. जुन्या अटी शिथिल केल्याने दोन लाखांच्या मदतीचा मार्ग मोकळा झाला असला, तरी प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांना आणखी काही महिने वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.
Rohit Pawar on Farmer Loan Waiver
आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर जोरदार निशाणा साधला. पंढरपूरमधील अन्नत्याग आंदोलनामुळेच सरकारला अटी मागे घ्याव्या लागल्याचा दावा त्यांनी केला.
“सरकारने प्राप्तिकर विभागाकडून शेतकऱ्यांची माहिती मागवली आहे. यामुळे ३ ते ४ लाख शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात,” अशी भीती पवारांनी व्यक्त केली. ‘लाडकी बहीण’ योजनेप्रमाणेच माहिती संकलनात वेळ गेल्यास कर्जमाफी लांबेल, असा थेट आरोप त्यांनी केला.
जर सरकारने तातडीने कर्जमाफीचा प्रश्न मार्गी लावला नाही, तर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात विदर्भात मोठं आंदोलन छेडू, असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिला आहे. सोबतच बीडच्या शेतकऱ्यांचे रखडलेले ८०० कोटी आणि थकीत मनरेगा निधीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले.
दुसरीकडे, अजित पवारांच्या हेलिकॉप्टर अपघातप्रकरणी येत्या २८ तारखेला व्हीएसआर कंपनीच्या संबंधांवर मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच, राज्यात एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याचे सूचक विधानही त्यांनी केले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आले आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- साताऱ्यात शेतकऱ्याने रस्त्यावर ओतलं शेकडो लिटर दूध; तुकाराम मुंढेंचा धसका की नेमकं घडलंय काय?
- विद्याधर जोशींचा संतप्त सवाल: बाजारातून ‘ओल्ड मॉन्क’ अचानक गायब; नेमकं चाललंय काय?
- आमिरला हिंदू मुलीच का आवडतात? पुतळा जाळत बजरंग दलाचा मोठा आरोप, नेमकं काय घडलं?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












