🕒 1 min read
Maharashtra CM: महाराष्ट्राला खरंच नवा मुख्यमंत्री मिळणार का? गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात या प्रश्नाने चांगलीच चर्चा रंगवली आहे. त्यातच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी थेट देवेंद्र फडणवीसांच्या जागी नव्या नावाची घोषणा करून मोठी खळबळ उडवून दिली.
देवेंद्र फडणवीस लवकरच केंद्रात मंत्री होणार आणि त्यांच्या जागी चंद्रशेखर बावनकुळे राज्याचे नवे मुख्यमंत्री होऊ शकतात, असा मोठा गौप्यस्फोट राऊत यांनी केला. एकनाथ शिंदेंना आता पुन्हा संधी मिळणार नाही, असा दावाही त्यांनी केला. त्यामुळे राजकारण चांगलंच तापलं होतं.
‘देवेंद्र फडणवीसच २०३४ पर्यंत मुख्यमंत्री राहणार’
संजय राऊतांच्या या विधानानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्वतः मैदानात उतरून या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सूत्रांच्या माहितीवर अवलंबून न राहता त्यांनी थेट सोशल मीडियावरून राऊतांचे दावे खोडून काढले आहेत.
“सध्या अफवांचा बाजार गरम असून ही केवळ पेरलेली अफवा आहे,” असं बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच २०३४ पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहावेत, ही राज्यातील १४ कोटी जनतेची भावना असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलं.
तसंच, कुणीही मुख्यमंत्री होण्याची घाई करू नये, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. या सर्व घडामोडींवरून मुख्यमंत्रिपदावरून राजकीय वर्तुळात अजूनही बरीच धूसफूस सुरू असल्याचं चित्र आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- पाकिस्तानचे दोन तुकडे होणार? 15 जुलैला पाकच्या संसदभवनातून होणार सर्वात मोठी घोषणा
- ‘…तर तुम्हाला जनतेसमोर उघडे पाडू!’ सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारवर भडकलं
- पावसाची विश्रांती संपणार! राज्यात पुन्हा मुसळधार; हवामान खात्याचा मोठा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












