Share

जामिनावर सुटताच आरोपीचा सूड; आधी स्वतःचं कुटुंब, मग पीडितेसह ६ जणांची अमानुष हत्या

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात जामिनावर सुटलेल्या पॉक्सो आरोपीने स्वतःचे कुटुंब आणि बलात्कार पीडितेसह एकूण ६ जणांची निर्घृण हत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

Published On: 

Telangana Crime News police investigating mass murder incident in village

तेलंगणा: कायद्याचा धाक उरलाय की नाही? असा प्रश्न पडावा अशी एक अंगावर काटा आणणारी घटना समोर आली आहे. बलात्काराच्या आरोपाखाली जेलमध्ये गेलेला आरोपी जामिनावर बाहेर येतो आणि ६ जणांच्या रक्ताचा पाडतो.

तेलंगणाच्या रंगारेड्डी जिल्ह्यात हा थरकाप उडवणारा प्रकार घडला आहे. राजकुमार नावाच्या नराधमाने अवघ्या काही तासांत आपली ३० वर्षीय पत्नी आणि ४ वर्षे व १८ महिन्यांच्या दोन निष्पाप लेकरांना निर्घृणपणे संपवलं. इथवरच न थांबता तो सहा किलोमीटर पुढच्या गावात गेला आणि ज्या १७ वर्षीय मुलीने त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, तिलाही संपवलं.

Telangana Crime News: पोलिसांच्या दुर्लक्षामुळे ६ निष्पाप जीव गेले?

या माथेफिरूने केवळ पीडित मुलीलाच नाही, तर तिच्या आई आणि आजीचीही निर्घृण हत्या केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीने १६ मे रोजी राजकुमारविरुद्ध पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांच्या हलगर्जीपणामुळेच हा अनर्थ घडल्याचा गंभीर आरोप मुलीचे काका नरेश यांनी केला आहे.

नरेश यांनी संताप व्यक्त करत मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले, “त्याने आमच्या कुटुंबाला संपवण्याची धमकी आधीच दिली होती. गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी त्याला रिमांडवर घेतलं नाही. लाच देऊन प्रकरण दाबण्यात आलं आणि तो जामिनावर बाहेर आला.” गुन्हेगार उजळ माथ्याने फिरत असल्याची कल्पना देऊनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याने आज हा भीषण प्रसंग ओढवल्याचे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे, या भयंकर घटनेने अल्पवयीन मुलांवरील लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी बनवलेल्या पॉक्सो कायद्याच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीवरच मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. आता या प्रकरणात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांना निलंबित करा आणि आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी संतप्त नातेवाईक करत आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी महाराष्ट्र देशाच्या उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही