Share

‘हे फडणवीसांचे मुख्यमंत्री म्हणून शेवटचे अधिवेशन’; आदित्य ठाकरेंचा मोठा दावा

ठाकरे गटातील पक्षांतरामागे ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’ असल्याचा आरोप करत, हे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे शेवटचे अधिवेशन असल्याचा मोठा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

Published On: 

CM Devendra Fadnavis - Aditya Thackeray

मुंबई : शिवसेना (Shivsena) (ठाकरे गट) मधून पुन्हा झालेल्या पक्षांतरानंतर राज्यातील राजकारण तापले आहे. ठाकरे गटाचे सहा खासदार शिंदे गटात (Shinde Gat) दाखल झाले असून, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांचे निकटवर्तीय मानले जाणारे सचिन अहिर यांनीही अलीकडेच शिंदे गटात प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी या घडामोडींचा संबंध मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांना कमकुवत करण्याच्या राजकीय डावाशी जोडला आहे.

‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’चा आरोप

एका मुलाखतीत आदित्य ठाकरे म्हणाले की, राज्यात सुरू असलेल्या राजकीय हालचाली या केवळ पक्षांतरापुरत्या मर्यादित नाहीत. हा संपूर्ण प्रकार ‘ऑपरेशन देवेंद्र फडणवीस’चा भाग आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्या इशाऱ्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करत आहे.

राष्ट्रीय राजकारणातून फडणवीसांना दूर करण्याचा प्रयत्न?

आदित्य ठाकरे यांच्या मते, राष्ट्रीय स्तरावर संभाव्य नेतृत्व म्हणून पाहिले जाणारे नेते पद्धतशीरपणे बाजूला केले जात आहेत. त्याच धर्तीवर देवेंद्र फडणवीस यांनाही राष्ट्रीय राजकारणात मर्यादित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पंतप्रधानपदाच्या संभाव्य दावेदारीलाही धक्का देण्याचा प्रयत्न होत आहे, असा दावा त्यांनी केला.

‘हे फडणवीसांचे शेवटचे अधिवेशन’

मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे हे शेवटचे विधिमंडळ अधिवेशन (Assembly) आहे. लवकरच फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात दिसतील. “हे माझे शब्द लिहून ठेवा,” असा दावा आदित्य ठाकरेंनी केला. त्याचवेळी, एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी प्रयत्न करतील, असेही त्यांनी नमूद केले.

गडकरी-शिवराज यांचा दाखला

आपल्या दाव्याचे समर्थन करताना आदित्य ठाकरे यांनी नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांच्या राजकीय प्रवासाचा संदर्भ दिला. ते म्हणाले, “नितीन गडकरी तिसऱ्यांदा भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्याच्या चर्चेत असताना त्यांच्याशी संबंधित विविध वाद पुढे आले. त्याचप्रमाणे, मध्य प्रदेशचे यशस्वी मुख्यमंत्री म्हणून ओळख निर्माण केलेल्या शिवराज सिंह चौहान यांनाही अचानक केंद्रीय मंत्रिमंडळात पाठवण्यात आले. या घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.”

पक्षांतरामागे पैशांचे राजकारण?

आदित्य ठाकरे म्हणाले की, शिंदे गटाच्या नेत्यांच्या व्हायरल व्हिडीओवरून महाराष्ट्रातील राजकीय पॅटर्न दिसून येतो. स्वतःच्या आर्थिक उन्नतीसाठी पक्षांतर केल्याचे दिसते. तसेच सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर काही नेत्यांची संपत्ती अचानक वाढली, असाही दावा आदित्या ठाकरे यांनी केला.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही