🕒 1 min read
‘देऊळ बंद २’ (Deool Band 2) या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८० कोटींचा गल्ला पार केलाय, हे तर तुम्हाला माहितीच असेल. पण तुम्हाला हे माहितीये का, की बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) ऐनवेळी मदतीला धावून आला नसता, तर हा सिनेमा कदाचित थिएटरपर्यंत पोहोचलाच नसता?
खुद्द दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीच एका मुलाखतीत हा मोठा गौप्यस्फोट केला आहे. सिनेमाचं बजेट पूर्णपणे कोलमडलं असताना, शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज’ कंपनीने चक्क ४० ते ४५ लाख रुपयांचं बिल माफ केलं. त्यामुळेच रखडलेला हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकला आहे.
Shah Rukh Khan Deool Band 2
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत प्रवीण तरडेंनी या पडद्यामागच्या संघर्षाचा उलगडा केला. सिनेमाच्या शूटिंगनंतर बजेट १२ लाखांवरून थेट ४२ लाखांवर पोहोचलं होतं. हातात पैसे शिल्लक नव्हते आणि थिएटरमध्ये सिनेमा लावण्यासाठी डीसीपी (Digital Cinema Package – डिजिटल फॉरमॅट) काढणं अत्यंत गरजेचं होतं. पैशांशिवाय ही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होणं शक्यच नव्हतं.
अशा कोंडीत सापडलेल्या टीमने थेट शाहरुख खानच्या ‘रेड चिलीज’ कंपनीकडे विनंती केली. “मुलशी पॅटर्नवाल्याचा सिनेमा आहे,” हा निरोप शाहरुखपर्यंत पोहोचवण्यात आला.
अभिनेता सलमान खानसोबत ‘अंतिम’ सिनेमा केल्यामुळे बॉलिवूडमध्ये प्रवीण तरडेंचं काम परिचयाचं होतं. त्यामुळेच शाहरुखने क्षणाचाही विलंब न लावता मोठा निर्णय घेतला. “सिनेमा चांगला बनलाय ना? मग पैशांचं नंतर बघू,” असा निरोप थेट रेड चिलीजकडून आला आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला.
शाहरुखच्या याच एका निर्णयामुळे तब्बल ४५ लाखांच्या बिलाची चिंता मिटली. किंग खानला सिनेमा आणि टीमबद्दल वाटलेली ही आपुलकी खूप काही सांगून जाते, अशी कृतज्ञतेची भावना तरडेंनी व्यक्त केली.
पुणे येथील ‘डॉन’ स्टुडिओच्या हेमंत गुजराती यांचेही त्यांनी विशेष आभार मानले. दुसरीकडे, सध्या महाराष्ट्रात ‘देऊळ बंद २’ ची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. आता चाहत्यांना ‘देऊळ बंद ३’ चे वेध लागले आहेत.
सिनेमाच्या शेवटी अमेरिकेत असलेल्या राघव शास्त्रीला (गश्मीर महाजनी) थेट अक्कलकोटहून स्वामी समर्थांचा फोन येतो. हे दृश्य पाहिल्यानंतर पुढच्या भागात काय घडणार, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- अभिनेत्री संचिता उगले मृत्यू प्रकरण: AICWA चं मोठं पाऊल, थेट देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून केली ‘ही’ मागणी
- अरविंद सावंत यांचा मोठा गौप्यस्फोट: ‘ऑपरेशन टायगर’ फेल? ९ खासदारांबद्दल केला खळबळजनक दावा
- ठाकरे गटाचे ‘ते’ ६ बंडखोर खासदार दिल्लीतून अचानक गायब; एकनाथ शिंदेंची रणनीती बदलली?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












