उद्धव ठाकरे यांना दिल्लीत मोठा धक्का, लोकसभा अध्यक्षांनी ६ बंडखोर खासदारांच्या स्वतंत्र गटाला दिली मंजुरी?

ठाकरे गटाचे ६ खासदार फुटल्याची माहिती. लोकसभा अध्यक्षांनी स्वतंत्र गटाला मंजुरी दिल्याने हे खासदार शिंदे गटात प्रवेश करण्याची दाट शक्यता.

Published On: 

Uddhav Thackeray and Om Birla over Shivsena MP split case

दिल्ली – एका बाजूला मुंबईत पक्षाच्या वर्धापन दिनाची तयारी सुरू असतानाच, दुसरीकडे दिल्लीतून उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत धक्कादायक बातमी आली आहे. ठाकरे गटाचे ६ लोकसभा खासदार फुटले असून त्यांच्या स्वतंत्र गटाला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मंजुरी दिल्याचं वृत्त समोर आलं आहे.

या राजकीय भूकंपामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. काल रात्रीच या बंडखोर खासदारांनी स्वतंत्र गटासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज केला होता, ज्यावर तातडीने निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Uddhav Thackeray गटात फूट; ६ खासदार शिंदेंच्या शिवसेनेत जाणार?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय जाधव, ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाकचौरे, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख आणि संजय दिना पाटील या सहा खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. हे सर्वजण मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून शिंदे गटात अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे.

त्यामुळेच आज ठाकरे गटाने जारी केलेल्या व्हीपला आता कायदेशीर अर्थ उरला आहे का, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बंडखोर खासदारांनी कालच पत्र दिल्यामुळे हा व्हीप आपल्याला लागू होत नसल्याचा दावा केला आहे.

दुसरीकडे, हा डॅमेज कंट्रोल करण्यासाठी खासदार संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे तातडीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या दालनात पोहोचले. अरविंद सावंत यांनी यापूर्वीच अध्यक्षांना ४ पानांचे पत्र पाठवून ठाकरे गटाची बाजू ऐकून घेण्याची विनंती केली होती. मात्र, विरोधी गटाला आधीच मंजुरी मिळाल्याने आता ठाकरेंच्या शिवसेनेचा शिंदे गटातील विलीनीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्र आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही