🕒 1 min read
मुंबई – तामिळनाडूच्या राजकारणात सध्या मोठा भूकंप झाला आहे का? ज्या नेत्यावर भाजपने राज्याची सर्व भिस्त ठेवली होती, त्याच के. अण्णामलाई यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला आहे.
माजी प्रदेशाध्यक्ष असलेल्या अण्णामलाई (K Annamalai) यांनी थेट आपला नवा पक्ष स्थापन करण्याची मोठी घोषणा केली आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करत त्यांनी २०३१ च्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष संपूर्ण ताकदीने रिंगणात असेल असे स्पष्ट केले.
अण्णामलाई यांनी भाजप का सोडली?
भाजपमध्ये राहावे की तामिळ लोकांशी जोडलेले राहावे, हा माझ्यापुढचा सर्वात मोठा प्रश्न होता, असे अण्णामलाई यांनी म्हटले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजीच राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण आधी निवडणुका संपू द्या, असा सल्ला पक्षाने त्यांना दिला होता. त्यामुळेच त्यांनी २ जून रोजी अधिकृत राजीनामा दिला आणि हे पत्र आता समोर आले आहे.
या राजीनाम्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे हायकमांडशी असलेले मतभेद. गेल्या दीड वर्षांपासून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे विचार जुळत नव्हते. तामिळनाडूचे राजकारण पुढे नेमके कसे न्यावे, यावर दिल्लीतील नेतृत्व आणि अण्णामलाई यांच्यात एकमत होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटक केडरचे माजी आयपीएस अधिकारी असलेले अण्णामलाई २०२० मध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन भाजपमध्ये आले होते. त्यांनी ‘एन मन, एन मक्कल’ यात्रेच्या माध्यमातून राज्यभर मोठा जनसंपर्क वाढवला. तरीही २०२१ आणि २०२४ च्या निवडणुकांमध्ये त्यांना वैयक्तिक पराभवाचा सामना करावा लागला होता.
नुकत्याच झालेल्या २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे अभिनेता विजयच्या नव्या पक्षाने तब्बल १०८ जागा जिंकून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली. या राजकीय स्थित्यंतरात अण्णामलाई यांचा हा नवा निर्णय राजकारणाला वेगळी दिशा देणारा ठरू शकतो.
📌 महत्वाच्या बातम्या
- ‘तुझं आजारपण प्रसिद्धीसाठी वापर, माझ्यावर भुंकू नकोस’; शिल्पा शिंदेचा हिना खानवर संताप
- स्वयंपाकघरात शेजाऱ्याचा मृतदेह अन्..; ओटीटीवर माधुरी दीक्षितच्या ‘त्या’ नव्या सिनेमाने उडवली खळबळ!
- कंगनाची ‘ती’ पोस्ट शेअर केली अन् गिरीजा ओकचे हजारो फॉलोअर्स घटले; अभिनेत्रीने स्वतःच केला खुलासा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












