रोहित पवारांचा शिंदे गट आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल! ‘दात नसलेले वाघ’ म्हणत उडवली खिल्ली

अंबादास दानवेंनी दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर रोहित पवारांनी शिंदे आणि अजित पवार गटाला ‘दात नसलेले वाघ’ म्हणत जोरदार टीका केली आहे.

Published On: 

Rohit Pawar on Shivsena Merger criticizing Eknath Shinde and Ajit Pawar group

पुणे – राजकारणात कधी कोण कोणासोबत जाईल आणि कोण कोणाला पाण्यात पाहील, याचा काहीच नेम नसतो. आता ठाकरे आणि शिंदे गट खरंच पुन्हा एकत्र येणार का? या एका प्रश्नाने सध्या महाराष्ट्राचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

सध्या मित्रपक्षच शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करत असल्याचा धक्कादायक आरोप अब्दुल सत्तार यांनी केला होता. भाजपला आमच्या त्यागाचा विसर पडला असून, आपले दोन तुकडे झालेत, त्यामुळे आता दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, अशी खदखद अब्दुल सत्तारांनी बोलून दाखवली.

ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी नुकतीच दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात अशी उघड इच्छा व्यक्त केली. यावर संजय राऊत यांनी आपल्या नेहमीच्या आक्रमक शैलीत हल्लाबोल केला. “शिवसेना एकच आहे आणि जिथे ठाकरे आहेत, तीच खरी शिवसेना. बाकी ज्याला हे लोक शिवसेना म्हणतायत, ती तर अमित शहांची शिवसेना आहे,” असा घणाघात राऊतांनी केला. पण याच चर्चेत आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उडी घेतली असून, सत्ताधाऱ्यांवर थेट निशाणा साधलाय.

Rohit Pawar on Shivsena Merger

“शिंदेंची शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ आहेत, ते आता फक्त गुरगुरतात,” असा घणाघात रोहित पवारांनी केलाय. या वाघांना आता भाजपची साथ सोडण्याचं धाडस होणार नाही, असंही ते म्हणाले.

हे दोन्ही पक्ष आता भाजपला सोडून कुठेही जाणार नाहीत. अजितदादांमध्ये ती धमक होती, कारण २०२९ मध्ये ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार ठरू शकले असते. पण आता कुणीही भाजपला सोडण्याची हिंमत करणार नाही, असा टोला पवारांनी लगावला.

सत्ताधाऱ्यांच्या गोटात सध्या जी काही अस्वस्थता दिसतेय, ती केवळ सत्तेसाठी आणि खुर्चीसाठी आहे. दुसरीकडे, आम्ही मात्र जनतेच्या प्रश्नांसाठी लढत आहोत अशी स्पष्ट भूमिका रोहित पवारांनी मांडली आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही