🕒 1 min read
मे महिन्याच्या उन्हाने आधीच अंगाची लाहीलाही होत असताना, आता निसर्गाचा आणखी एक लहरीपणा समोर आलाय. एका बाजूला अंगाला चटके देणारं ऊन, तर दुसऱ्या बाजूला अचानक येणारा पाऊस, यामुळे नेमकं काय वाढून ठेवलंय हाच प्रश्न सध्या पडतोय.
विदर्भ आणि मराठवाड्यात (Maharashtra Weather) तर सूर्य जणू आग ओकतोय. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या माहितीनुसार, अमरावतीत देशातील उच्चांकी ४५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीये.
Maharashtra Weather Update
अकोला, वर्धा आणि नागपूरची स्थितीही वेगळी नाही, इथेही पारा ४५ अंशांच्या पार गेलाय. प्रशासनाने या जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) गंभीर इशारा दिला आहे.
दुसरीकडे, राज्याच्या इतर भागांत वेगळंच चित्र आहे. धाराशिव, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सोलापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना अचानक येणाऱ्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय. दुपारच्या वेळी उन्हाचा चटका आणखी वाढणार असल्याने नागरिकांनी दुपारी १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणं टाळावं, असं स्पष्ट आवाहन प्रशासनाने केलंय.
अकोल्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाच्या झळांनी नागरिक हैराण आहेत. आता तापमानात किंचित घट होऊन पारा ४५.४ अंशांवर आला असला तरी उकाडा मात्र कायम आहे. या बदलत्या Weather मुळे प्रशासनाचीही धांदल उडाली आहे.
उन्हाच्या या रौद्र रूपामुळे पाणीटंचाईचं संकटही आता गडद होऊ लागलंय. धुळ्यात पांझरा नदीचं पात्र कोरडंठाक पडलंय, तर जळगावच्या गिरणा धरणात केवळ ३२ टक्केच पाणीसाठा शिल्लक राहिलाय. वाढत्या उन्हामुळे पाण्याचं बाष्पीभवन वेगाने होतंय. येत्या काळात पावसाला उशीर झाल्यास परिस्थिती भयंकर होईल. त्यामुळे आता प्रशासनासोबतच नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करणं काळाची गरज बनली आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- शुभमन गिलचा स्वतःच्याच संघावर संताप; ‘त्या’ एका चुकीमुळे गुजरातचा पराभव
- तेजश्री प्रधान आणि राकेश बापट खरंच लग्न करणार आहेत का? तेजश्री प्रधानची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली…
- विद्याधर जोशींचा थेट मोदींना टोला; ‘वर्क फ्रॉम होम’च्या आवाहनावर अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट व्हायरल!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












