🕒 1 min read
पुणे – तुम्ही मला टीममधून काढू शकता, पण माझा क्लास नाही! हेच पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) आपल्या बॅटने सिद्ध करून दाखवलं आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून निवड समितीने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला, पण या ‘पुणेरी वाघा’ने मैदानावर असा काही दणका दिला की टीकाकारांची बोलतीच बंद झाली. टीम इंडियातून वगळल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) शतकी खेळी करत रेकॉर्ड्सचा पाऊस पाडला आहे.
Ruturaj Gaikwad in Vijay Hazare Trophy Records
गोव्याविरुद्धच्या सामन्यात महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट होती. अवघ्या २ धावांत ३ विकेट्स गेल्याने संघ अडचणीत सापडला होता. अशा वेळी कर्णधार ऋतुराजने सूत्रे हाती घेतली. त्याने एका बाजूने विकेट्स पडत असतानाही संयमी पण आक्रमक खेळी केली. विकी ओस्तवालसोबत महत्त्वाची भागीदारी करत त्याने महाराष्ट्राला सावरले. ऋतुराजने १३१ चेंडूत नाबाद १३४ धावा कुटल्या. यात ८ चौकार आणि ६ षटकारांचा समावेश होता.
या शतकासह ऋतुराजने विजय हजारे ट्रॉफीच्या इतिहासात सर्वाधिक १५ शतके ठोकण्याच्या अंकित बावणेच्या (Ankeet Bawane) विक्रमाशी बरोबरी केली आहे. विशेष म्हणजे अंकितला यासाठी ९४ डाव लागले, तर ऋतुराजने ही करामत अवघ्या ५९ डावांत करून दाखवली.
इतकेच नाही तर, लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद २० शतके पूर्ण करणारा तो जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने ९५ डावांत हा पल्ला गाठला. तसेच, त्याची लिस्ट-ए मधील सरासरी आता ५८.८३ झाली असून, त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज मायकल बेवन (Michael Bevan) यालाही मागे टाकले आहे. रायपूरमध्ये पहिले वनडे शतक ठोकूनही त्याला संघातून वगळण्यात आले होते, त्या अन्यायाला त्याने बॅटने दिलेलं हे उत्तर निवड समितीला नक्कीच झोंबणारं आहे.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये सर्वाधिक शतके:
ऋतुराज गायकवाड – १५*
अंकित बावणे – १५
देवदत्त पडिक्कल – १४
मयंक अग्रवाल – १३
📌 महत्वाच्या बातम्या
- काँग्रेसला ‘जोर का झटका’! 11 नगरसेवकांचा अख्खा गटच भाजपात; अंबरनाथमध्ये ‘ऑपरेशन लोटस’?
- महेश मांजरेकर मुंबई सोडायला तयार? मुलाखतीत राज-उद्धवसमोरच मोठं विधान; म्हणाले, “मला लाज वाटते…”
- टीम इंडियाच्या कॅम्पमधून पंत ‘गायब’? रोहित-विराट पोहोचले, पण ऋषभ कुठे अडकला? कारण आलं समोर!
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












