Share

मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? : संजय राऊत

Sanjay Raut slams Eknath Shinde after heavy rains flood Mumbai, says “Where is Shinde while Mumbai sinks?”

Published On: 

Shiv Sena Eknath Shinde Criticized Sanjay Raut over his statement about Waqf Bill

🕒 1 min read

मुंबई– दोन दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मुंबई शहराची तुंबई झाली. रुग्णालयात पाणी घुसल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली, रेल्वे आणि रस्ते वाहतूक ठप्प झाली आणि भुयारी मेट्रो स्थानकातही पाणी घुसल्याने सामान्य जनतेला मनस्ताप सहन करावा लागला. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

“मुंबई-ठाणे बुडाले, पण एकनाथ कुठंय?” असा सवाल करत राऊतांनी म्हटले की, “एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री आहेत, पण ते महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुलचालनात गुंतले आहेत.” त्यांनी भाजपवरही हल्लाबोल करत म्हटले, “हे व्यापाऱ्यांचा पक्ष आहे. मुंबईला शेअर बाजारासारखं जुगारावर लावण्याचा कट आहे.”

Sanjay Raut Slams Eknath Shinde After Mumbai Rains Flood

संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, अमित शाह (Amit Shah) आहेत कोण? देशावर लादलेले गृहमंत्री आहेत ठीक आहे.. मुंबईत काल महापूर आला. ही जबाबदारी कोणाची आहे तर एकनाथ शिंदेंची आहे. ते नगरविकासमंत्री आहेत. महापालिका कोणाकडे आहे? मुंबई तुंबली तेव्हा आनंद दिघे अनेकांच्या स्वप्नात गेले, विचारलं एकनाथ कुठे आहे? मुंबई आणि ठाणे बुडालं एकनाथ कुठंय? एकनाथ शिंदे अमित शाहांचं (Amit Shah) लांगुणचालन करण्यात व्यस्त आहेत. एकनाथ कुठंय तर महाराष्ट्र द्रोह्यांच्या लांगुणचालनात आहे.

संजय राऊत यांनी केंद्र सरकारवरही निशाणा साधत विचारलं, “साडेतीन वर्ष सत्ता तुमच्याकडे,  काही झालं की, अजूनही नेहरू-मनमोहन यांचं नाव का?” मोठा गाजावाज करत मुंबईतील भुयारी मेट्रोचं उद्घाटन केलं. काल जनतेचे हजारो कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचंही त्यांनी ठणकावून सांगितलं.

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!