Share

“जातीयवाद पोसला जातोय, भुजबळ जातीवादी” – भुजबळांच्या मंत्रिमंडळात समावेशावरून मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange criticizes Ajit Pawar for promoting caste-based politics and questions Bhujbal’s return to the cabinet.

Published On: 

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis over Aurangzeb Tomb Controversy

🕒 1 min read

मुंबई | 20 मे – राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुंबईतील राजभवनात पार पडलेल्या या शपथविधी सोहळ्यात त्यांनी पुन्हा एकदा मंत्रिमंडळात प्रवेश केला. काही दिवसांपूर्वी संतोष देशमुख हत्या प्रकरणाने धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता, आणि त्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर भुजबळांना संधी देण्यात आली.

भुजबळ यांना पुन्हा अन्न आणि नागरी पुरवठा खातं मिळण्याची शक्यता असून, महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी समता परिषदेच्या माध्यमातून ठिकठिकाणी सभा घेऊन आपली भूमिका मांडली होती. त्यावेळी त्यांनी थेट अजित पवार यांच्यावरही अप्रत्यक्ष टीका केली होती.

Manoj Jarange Slams Ajit Pawar Over Caste Politics

मात्र, भुजबळांच्या या पुनरागमनावर मराठा आरक्षणाचे आंदोलन नेते मनोज जरांगे यांनी तीव्र शब्दांत प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवार जातीवादी लोकांना पोसत आहेत. भुजबळांना मंत्री केल्याने मराठा समाजावर काही फरक पडत नाही,” असं ते म्हणाले. तसेच, “त्यांना तात्पुरता आनंद देण्यात आला आहे. चॉकलेट दिलं आहे. ही रणनीती देवेंद्र फडणवीस यांची असू शकते,” असा आरोपही त्यांनी केला.

जरांगेंनी पुढे म्हटलं की, “भुजबळ जातीवादी आहेत, त्यांना मंत्रिपद देणं हे चुकीचं आहे. अजित पवार यांच्या भूमिकेवर आता प्रश्न उपस्थित होतो.”

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही