🕒 1 min read
Hair Loss । अनेकजण केसगळतीच्या समस्येने हैराण आहेत. महागडे उपचार घेऊन देखील अनेकांना या समस्येपासून सुटका मिळत नाही. खराब जीवनशैली, अयोग्य आहार आणि वाढते प्रदूषण यामुळे अनेकांना या समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच आता एका धक्कादायक आजाराने थैमान घातल्याचे समोर आले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात असणाऱ्या बोंडगाव, कालवड, हिंगणा या गावातील लोकांना अवघ्या तीन दिवसांत टक्कल (Buldhana Hair Loss) पडत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महत्त्वाचे म्हणजे हा आजार झाल्यानंतर डोके खाजवणे, नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत आहे.
हा आजार नेमका कशामुळे होत आहे? याची कोणतीच माहिती समोर आली नाही. यात महिलांचा देखील समावेश आहे. या विचित्र आजारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केस गळतीचे प्रकार आढळला तर त्या व्यक्तीने तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्रात जावे. तसेच अंघोळीसाठी अशुद्ध पाणी वापर न करता केवळ गरम पाण्याचा वापर करावा, असे आरोग्य विभागातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
Buldhana Hair Loss
दरम्यान, मागील दहा ते पंधरा दिवसांपासून असे प्रकार सुरु झाला आहे. या अजब आजारामुळे सर्व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग याबाबत नेमकी काय पावलं उचलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या :
- Sunil Tatkare यांची शरद पवार गटाच्या खासदारांना ऑफर; पडद्यामागे घडतंय काय?
- बीड प्रकरण पुन्हा तापलं! Sharad Pawar यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करूनच…
- मोठी बातमी । खंडणीखोर Walmik Karad ला लवकरच जामीन मिळेल?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now










