Balasaheb Thorat | प्रियंका गांधींवरील ‘त्या’ वक्तव्यावर थोरातांनी नितेश राणेंना सुनावलं, म्हणाले, “जितकी जास्त बडबड…”

नितेश राणेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी ट्विट करत नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

Published On: 

Balasaheb Thorat | प्रियंका गांधींवरील 'त्या' वक्तव्यावर थोरातांनी नितेश राणेंना सुनावलं, म्हणाले, "जितकी जास्त बडबड..."

Balasaheb Thorat | कणकवलीचे आमदार नितेश राणे ( NItesh Rane ) यांनी आतापर्यंत अनेकदा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. त्यांच्या वक्तव्यावरुन अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. अशातच आता त्यांनी अजून एक विधान केलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात वातावरण चांगलंच तापलेलं आहे. या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी जोरदार पलटवार केला आहे. त्यांनी ट्विट करत नितेश राणे यांच्यावर निशाणा साधला.

नितेश राणेंनी बोलताना सर्वच मर्यादा ओलांडल्या असल्याचं थोरात यांनी म्हंटल आहे. “केरळ सारख्या राज्याला मिनी पाकिस्तान म्हणणे, राहुल आणि प्रियांका गांधी यांना मतदान करणारे दहशतवादी असे हिणवणे हे उद्योग फक्त भाजपचे मंत्री करू शकतात! काही सकारात्मक करू शकत नसले की भाजप नेते हिंदू मुस्लिम, भारत पाकिस्तान हाच अजेंडा राबवतात. पण मंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीने सार्वजनिक रित्या बोलताना, वागताना भान बाळगले पाहिजे पण नितेश राणे यांनी सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत”, असंही ते म्हणाले.

“जितकी जास्त बाष्कळ बडबड तितकी जास्त प्रगती हे समीकरण भाजपमध्ये असल्याने मंत्री महोदयांनी पुन्हा एकदा तारे तोडले आहेत. पण मुख्यमंत्र्यांनी किमान आपल्या सहकाऱ्याला समजूत द्यावी, ही भाषा, हे वर्तन योग्य नाही, मंत्र्यांनी आपल्या पदाचे ग्रहण करताना शपथ घेतली आहे याची तरी आठवण ठेवावी आणि समाजात तेढ वाढणार नाही असे वर्तन करू नये!’ असं ट्विट बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे ?

“केरळ हा मिनी पाकिस्तान आहे, त्यामुळेच राहुल गांधी आणि त्यांची बहीण प्रियंका गांधी तेथे विजयी होतात, असे लोक त्यांना खासदार बनवण्यासाठी मतदान करतात, राहुल गांधींना आणि प्रियंका गांधींना अतिरेकी मतदान करतात. अतिरेकींना धरून ते खासदार झालेत” असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलं.

“आमच्या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आलेलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री ज्यांचं रक्त भगवं आहे, ते कडवट हिंदुत्ववादी आहेत. त्यामुळे आम्हाला आता टोकाची भाषणे आणि कोणाला इशारा देण्याची गरज नाही. आता आम्ही टोकाची भाषणे द्यायला लागलो, तर लोकच आम्हाला विचारतील तुमचे सरकार आहे, त्यामुळे आता आम्हाला असं काय करावं लागणार नाही” असं नितेश राणे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या :

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत

Journalist at Maharashtra Desha महाराष्ट्र देशा

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही