Share

Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत शोक व्यक्त केला आहे. 

Published On: 

Raj Thackeray | “त्यांनी न बोलता जे करून दाखवलं, ते अनेकांना…”; राज ठाकरेंची मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली!

🕒 1 min read

Raj Thackeray । देशाच्या विकास प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाच योगदान देणारे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं काल निधन ( Dr. Manmohan Singh Death ) झालं. ते 92 वर्षांचे होते. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गुरूवारी रात्री अचानक त्यांची तब्येत खालवली. त्यानंतर त्यांना एम्स रुग्णालयात नेलं. तिथे त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

मनमोहन सिंग यांच्या रुपाने देशाने आज एक रत्न गमावलं आहे. फक्त राजकीय विश्वातच नव्हे, तर सर्वसामान्यही त्यांच्या निधनाच्या बातमीने हळहळले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही डॉ. मनमोहन सिंग यांना आदरांजली वाहणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत शोक व्यक्त केला आहे.

“इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही”, असं म्हणत राज ठाकरेंनी मनमोहन सिंह यांना आदरांजली वाहिली आहे .

राज ठाकरे पोस्टमध्ये म्हणतात , “भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन झालं. १९९१ ला जेंव्हा मनमोहन सिंग देशाचे अर्थमंत्री झाले तेंव्हा देशाची अर्थव्यवस्था अतिशय तोळामासाची होती. एका बाजूला बर्लिन भिंत कोसळली होती आणि शीतयुद्धाचा शेवट झाला होता, साम्यवादी चीनच्या आर्थिक ताकदीची चुणूक दिसायला लागली होती. अशावेळेस भारतीय उद्योगांच्या पायात आधीच्या काँग्रेसच्या सरकारांनी ज्या बेड्या घातल्या होत्या, त्या तोडून काढण्याचं काम डॉ. मनमोहन सिंग यांनी उदारीकरणाचे धोरण स्वीकारून केलं. अर्थात नरसिंहरावांसारख्या पंतप्रधानाची साथ त्यांना लाभली हे देखील खरं.”

भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग.

जुलै १९९१ साली संसदेत भाषण करताना मनमोहनसिंगांनी एक वाक्य वापरलं होतं, “no power on earth can stop an idea whose time has come”. थोडक्यात भारताचा काळ सुरु होत आहे आणि आता त्याला कोणीच थांबवू शकत नाही. भारताच्या या काळाचा खरा शिल्पकार म्हणजे डॉ. मनमोहन सिग. पुढे ते देशाचे पंतप्रधान झाले. आणि ते देखील सलग दहा वर्ष. अशा पदावर बसलेल्या व्यक्तीच्या हातून घेतलेले काही निर्णय हे चांगले, तर काही चुकणार हे स्वाभाविक आहे. पण दुर्दैवाने त्यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात त्यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली गेली, त्यांच्या हेतुंवर शंका घेतली गेली, त्यावरून पत्रकारांशी संवाद साधताना एक वाक्य म्हणाले होते, “I do not believe that I have been a weak Prime Minister. I honestly believe that history will be kinder to me than the contemporary media or for that matter the Opposition in Parliament…. ” डॉ. मनमोहन सिंग यांच्यावर इतिहास कधीच क्रुद्ध होणार नाही, उलट त्यांचा गौरव करेल हे नक्की. भारतीयांमध्ये मग ते उद्योजक असोत, व्यावसायिक असोत, की नोकरदार वर्ग असो, अधिक उत्तम काहीतरी करावं, घडवावं यासाठी ‘ये दिल मांगे मोअर..’ ही जी वृत्ती भिनली आहे, त्याचे शिल्पकार हे डॉ. मनमोहन सिंगच.

डॉ. मनमोहन सिंग यांच्याबद्दल जगभरात एक उत्कृष्ट अर्थतज्ज्ञ म्हणून आदर होता, पुढारलेल्या देशांचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान यांच्या कृतीतून आणि वक्तव्यातून तो दिसून यायचा. जगभरातील अनेक विद्यापीठांमध्ये त्यांच्या ज्ञानाचा आणि कार्याचा गौरव झाला होता. इतकी बुद्धिमत्ता आणि कर्तृत्व असलेल्या मनमोहन सिंगांनी न बोलता, शांतपणे जे करून दाखवलं ते अनेकांना बोलून पण करून दाखवता आलेलं नाही. डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विनम्र अभिवादन… राज ठाकरे ।

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!