Share

कुटुंब फोडलं, पार्टी फोडली! देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व काय? – रोहित पवार

Barshi Rohit Pawar Vs Devendra Fadnavis | ” फडणवीस यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, तुकाराम महाराजांच्याबद्दल बोललं गेलं, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचं राज्य सुरु आहे, अशा स्थितीत तुम्ही शांत बसता. मग तुमचं हेच कर्तृत्व का?

Published On: 

Barshi । Rohit Pawar Vs Devendra Fadnavis : राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवस्वराज्य यात्रा सुरु आहे. यात्रा बार्शी मध्ये पोहचली आहे.  बार्शीत शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद शेतकरी संवाद मेळाव्याच आयोजन केलं होतं. यावेळी रोहित पवार यांनी बोलत होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कर्तृत्व काय? म्हणत जोरदार हल्लाबोल केला.

बार्शीचे आमदार राजेंद्र राऊतांवर टीका करत म्हणाले,” बार्शी तालुक्यात दडपशी खूप आहे. दुकान माझंच असावं, धंदा माझाच व्हावा, जमिन मीच घ्यावी, विकासाच्या कामाला वाळू माझीच हवी, खडी माझीच हवी, कॉन्ट्रॅक्टर माझा भाऊच असावा असे म्हणत रोहित पवारांनी नाव न घेता आमदार राजेंद्र राऊतांवर ( Rajendra Raut ) जोरदार टीका केली.

या भागात खोट्या केसेस खूप होत आहेत. पोलिसांना मला सांगायचय की, दोन महिन्यात सामान्यांचं महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. त्यामुळं सामान्य कार्यकर्त्यांवर येथील लोकप्रतिनीधींच येऊन खोट्या केसेस टाकल्या दोन महिन्यानंतर गाठ आमच्या सगळ्यांशी असल्याचे रोहित पवार म्हणाले.

Rohit Pawar Comment On Devendra Fadnavis At Barshi

पुढे बोलताना रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला. ते म्हणाले,” देवेंद्र फडणवीस यांचं कर्तृत्व काय? मला त्यांचा इतिहास बघायचाय. तुम्ही कुटुंब फोडलं, पार्टी फोडली, तुकाराम महाराजांच्याबद्दल बोललं गेलं, शेतकरी आत्महत्या करतायेत, राज्यात गुंडाचं राज्य सुरु आहे, अशा स्थितीत तुम्ही शांत बसता. मग तुमचं हेच कर्तृत्व का? असा सवाल शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. लोकसभेच लोकांनी जसं तुमचं कर्तृत्व धुवून काढलं तसं विधानसभेलासुद्दा लोक तुम्हाला धडा शिकवतील असं रोहित पवार म्हणाले.

लोकसभेच्या निवडणुकीत दिल्लीचे बादशाह ( Narendra Modi ) आले होते. त्यावेळी त्यांनी साहेबांवर ( Sharad Pawar ) टीका करताना भटकती आत्मा असं म्हटलं होतं. मला त्यांना सांगायचे आहे की, शरद पवार हे भटकती आत्मा नाहीत, तर इथं असलेल्या सामान्य लोकांची, महाराष्ट्र धर्म टिकवणाऱ्या लोकांची, स्वाभिमानी लोकांची पवारसाहेब ( Sharad Pawar ) आत्मा आहेत, असे रोहित पवार ( Rohit Pawar ) म्हणाले.

आमचा महाराष्ट्र आमचा स्वाभिमानी आहे. त्यामुळे तुम्ही कितीही ताकद लावली तरी महाराष्ट्रातील स्वाभिमानी लोकं तुम्हाला पाणी पाजल्याशिवाय राहणार नसल्याचे रोहित पवार म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही