Share

मी जर कोणाला धमकावले असते तर बारामतीकर पाठीशी राहिलेच नसते – अजित पवार

बारामती : पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले. संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते. जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलीस त्या … Read more

Published On: 

बारामती : पाणी देण्यासाठी मी जर कोणाला धमकावले असते तर जनतेने मला इतक्या मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिलाच नसता, असे स्पष्ट करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांना प्रत्युत्तर दिले.

संस्था चालविताना संस्थेच्या पद्धतीने चालवायची असते आणि राजकारण हे राजकारणाच्याच पद्धतीने करायचे असते. जर कोणी धमकावलेच असेल तर पोलिसांत तक्रार दाखल करावी, पोलीस त्या बाबतची कार्यवाही करतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

शरद पवार यांनी अजित पवार यांचे नाव न घेता दमबाजीला घाबरू नका, असे जाहीर सभेतून सांगितले होते. त्या बाबत विचारता अजित पवार यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.

एकनाथ खडसे यांच्या भाजपच्या घरवापसीबाबत विचारले असता ते म्हणाले, प्रत्येकाने काय करावे हे ज्याच्या त्याचा अधिकार आहे, राजकारणात अशा घटना घडत असतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून प्रत्येकाला अधिकार दिला आहे.

संजय राऊत यांनी लोकसभेची लढाई नरेंद्र मोदी विरुध्द उध्दव ठाकरे केली आहे, यावर तुमचे काय मत विचारले असता, पवार मिश्किलपणे हसत म्हणाले की, ‘एक वेळ नरेंद्र मोदी विरुध्द राहुल गांधी अशी लढाई आहे असे मान्य करता आले असते, पण राऊत यांचा पक्ष महाराष्ट्राबाहेर नाही, त्या मुळे असे होणार नाही. लोकांना पटेल असे तरी त्यांनी बोलावे असा सल्लाही अजित पवार यांनी संजय राऊत यांना दिला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही