Share

नाशिक लोकसभेच्या जागेवर भाजपचा पुन्हा दावा

🕒 1 min read Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेची जागा भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाला मिळणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारखे ठरेल. ही गोष्ट भाजपच्या ४०० पार नाऱ्यासाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी असे दिनकर पाटील म्हणाले. नाशिकच्या जागेवरून महायुतीत तीनही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण झाले. निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Nashik Lok Sabha : नाशिक लोकसभेची जागा भाजप सोडून इतर कुठल्याही पक्षाला मिळणे म्हणजे पराभवाला निमंत्रण देण्यासारखे ठरेल. ही गोष्ट भाजपच्या ४०० पार नाऱ्यासाठी अडचणीची ठरणार आहे. त्यामुळे प्राप्त परिस्थितीत नाशिकची जागा भाजपला सोडण्यात यावी असे दिनकर पाटील म्हणाले.

नाशिकच्या जागेवरून महायुतीत तीनही पक्षांमध्ये कुरघोडीचे राजकारण झाले. निर्णय घेण्यास विलंब झाल्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी माघार घेतली. त्यामुळे ही जागा शिवसेना शिंदे गटाकडे जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात असताना भाजपने पुन्हा एकदा या जागेवर दावा केला आहे.

सध्याची राजकीय परिस्थिती ही इतर कुठल्याही पक्षापेक्षा भाजपला अधिक अनुकूल आहे. नाशिक महानगरपालिका व त्र्यंबकेश्वर नगरपालिकेत सत्ता, मतदारसंघातील संघटन आदींच्या बळावर सर्व आमदार, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी महायुतीत ही जागा भाजपला सोडविण्याची मागणी लावून धरली.

विविध सर्वेक्षणांत भाजपचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे समोर आल्याचे दाखले दिले जात आहेत. शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या भ्रष्ट कारभारामुळे त्यांच्या प्रती नकारात्मक भावना आहे. त्यांच्या गैरकारभारामुळे जनमानसातील प्रचंड नाराजीचे रूपांतर मतदानात होईल. नाशिक लोकसभा मतदारसंघ आपण तीन वर्षांपासून पिंजून काढला असून विविध माध्यमांतून जनतेशी संपर्क राखल्याचा दावा दिनकर पाटील यांनी केला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवाराची घोषणा करण्यात बराच विलंब झाल्यामुळे भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही