Share

Weather Update | ऐन दिवाळीत पावसाचा धुमाकूळ, पुण्यासह काही भागात वादळी पाऊस

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. सर्वत्र दिवाळीची चाहूल लागलेली असताना राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. परवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला तर काल पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अशात पुढील काही दिवस राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक … Read more

Published On: 

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये राज्यातील वातावरणात बदल होताना दिसत आहे. सर्वत्र दिवाळीची चाहूल लागलेली असताना राज्यातील बहुतांश ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे.

परवा मुंबईमध्ये मुसळधार पाऊस झाला तर काल पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली. अशात पुढील काही दिवस राज्यामध्ये पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

त्यामुळे नागरिकांनी आवश्यक ती काळजी घेऊनच घराबाहेर पडावे, असे आवाहन हवामान खात्याकडून (Weather Update) करण्यात आले आहे.

A low pressure belt has formed in the Arabian Sea

राज्यात ऐन दिवाळीत पाऊस (Weather Update) धुमाकूळ घालत आहे. अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पाऊस धुमाकूळ घालत आहे.

येते चार दिवस ठाणे, पुणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यांमध्ये विजांसह पाऊस पडण्याचा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात (Weather Update) आला आहे.

तर कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, अहमदनगर, रायगड, रत्नागिरी, लातूर, नांदेड, बीड या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचं हवामान खात्याने (Weather Update) म्हटलं आहे.

Benefits of Ghee

दरम्यान, राज्यातील हवामानात बदल होत आहे. एकीकडे थंडी वाढत चालली आहे तर दुसरीकडे पाऊस धुमाकूळ घालत आहे. अशात आरोग्याची काळजी घेण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात तुपाचा समावेश करू शकतात.

या बदलत्या वातावरणात तुम्ही तुपाचे सेवन केल्याने तुमची रोगप्रतिकारशक्ती मजबूत होऊन तुम्ही सर्दी, खोकला, व्हायरल इन्फेक्शन इत्यादी आजारांपासून दूर राहू शकतात. त्यामुळं बदलत्या वातावरणात तुपाचे सेवन केल्याने तुमच्या आरोग्याला पोषण मिळू शकते.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही