Share

Sanjay Raut | राहुल नार्वेकर चोरांचे सरदार झालेय – संजय राऊत

🕒 1 min readSanjay Raut | मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीला खूप वेळ लावत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) चांगलंच सुनावलं आहे. अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील विधानसभा अध्यक्षांवर खोचक शब्दात टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष चोरांचे सरदार म्हणून काम करत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sanjay Raut | मुंबई: विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर शिवसेना अपात्र आमदारांच्या सुनावणीला खूप वेळ लावत आहे. याच पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाने राहुल नार्वेकरांना (Rahul Narwekar) चांगलंच सुनावलं आहे.

अशात आता या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील विधानसभा अध्यक्षांवर खोचक शब्दात टीका केली आहे. विधानसभा अध्यक्ष चोरांचे सरदार म्हणून काम करत असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

Rahul Narwekar is making Timepass web series – Sanjay Raut

आज (17 ऑक्टोबर) सकाळी प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, “शिवसेनेचा निर्णय लवकरात लवकर घ्या, असा सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांना वारंवार आदेश देत आहे.

एकनाथ शिंदे यांची नियुक्ती घटनात्मक पद्धतीने झालेली नाही, असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. एवढं सगळं होऊन देखील विधानसभा अध्यक्ष लवकर निर्णय घेत नाही.

विधानसभा अध्यक्ष टाइमपास 1, टाइमपास 2, टाईमपास 3 वेब सिरीज बनवत आहेत. शिंदे आणि त्यांचे आमदार चोर आणि लफंगे आहे, असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे.

विधानसभा अध्यक्ष त्यांना संरक्षण देत आहे. ते चोरांचे सरदार झाले आहे. विधानसभा अध्यक्ष हे एक मोठं आणि संविधानात्मक पद आहे. मात्र सध्याचे अध्यक्ष चोरांचे सरदार झाले आहे. ते संविधान आणि कायदा मानायला तयार नाही. चोरांना संरक्षण देणं हा त्यांचा अधिकार आहे का?”

दरम्यान, ठाकरे गटानं आजचा सामना अग्रलेखाच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर खूप शब्दात टीका केली आहे. समाजवादी हे धर्मनिरपेक्ष, तरीही वाजपेयींच्या सरकारात ते सामील झाले.

समाजवादी सरकारात आल्याने भाजपचे ‘हिंदुत्व’ मिलावटीराम झाले नव्हते काय? मुख्यमंत्री शिंदे यांनी पुढच्या काळात विधिमंडळ ग्रंथालयाचा वापर करणे गरजेचे आहे.

इतिहासाची पाने चाळली तर त्यांच्या अगाध ज्ञानाची त्यांनाच लाज वाटेल. ‘उचलली जीभ लावली टाळय़ाला’ हा त्यांचा प्रकार राज्याची प्रतिष्ठा धुळीस मिळवत आहे.

मिंध्यांनी पक्षांचर केले व ढोंगांतरही केले. त्यातून निर्माण झालेला ‘माजवाद’ जनता कायमचा गाडेल, असं आजच्या सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!