Share

Supriya Sule | जबाबदारीचा सरकारने त्याग केला का? – सुप्रिया सुळे

🕒 1 min read Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत … Read more

Published On: 

🕒 1 min read

Supriya Sule | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील शासकीय रुग्णालयाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. नांदेड येथील शासकीय रुग्णालय 24, ठाण्यातील शासकीय रुग्णालयात 27, नागपूर येथील शासकीय रुग्णालयात 25 तर छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालयात 20 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत दिली.

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर खोचक टीका केली आहे. या सरकारने जबाबदारीचा त्याग केला आहे का? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे.

It is the responsibility of the government to provide quality health facilities to the poor people – Supriya Sule

ट्विट करत सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, “शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी अब्जाधीश-कोट्यधीश जात नाहीत, पण गोरगरीब जनता जाते. कारण त्यांच्यासाठी शासकीय रुग्णालयांतील उपचार परवडणारे असतात.

या गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का?”

दरम्यान, या मुद्द्यावरून जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी देखील राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. ट्विट करत जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले, “या राज्यातील शासकीय रुग्णालये ही गोरगरिबांचे कत्तलखाने बनली आहेत.

ठाण्यातील शासकीय रुग्णालयात एकाच दिवसात 27 मृत्यू, नांदेडमध्ये एकाच दिवसात 24 मृत्यू, काल घाटी (संभाजी नगर) येथे जवळपास 20 जणांचा मृत्यू, तर आज नागपूरमध्ये 24 तासात 25 जणांचा मृत्यू. इतक्या भयंकर घटना घडत आहेत.

यावर हे ट्रीपल इंजिनच राज्य सरकार आणि संबंधित खात्याचे मंत्री अवाक्षर काढायला तयार नाहीत. या रुग्णालयात पुरेश्या सुविधा नाहीत, स्टाफ ची कमकरता आणि औषधांचा पडलेला दुष्काळ गोर गरीब रुग्णांच्या जीवावर बेततो आहे.

राज्यातील फक्त शासकीय रुग्णालयेच नाही तर हे ट्रीपल इंजिन सरकार देखील वेंटीलेटर वर असल्याचं दिसून येत आहे. इतकं अकार्यक्षम आणि असंवेदनशील राज्य सरकार या राज्याने कधीच अनुभवलेले नाही.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही