🕒 1 min read
Maratha Reservation | जालना: आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाज सध्या पेटून उठला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) गेल्या 17 दिवसापासून जालना जिल्ह्यामध्ये आंदोलन करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मनोज जरांगे यांची उपोषण स्थळी जाऊन भेट घेतली आहे. एकनाथ शिंदे यांनी भेट घेतल्यानंतर जरांगे यांची समजूत काढली आहे. यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.
Today (September 14) Eknath Shinde has met Manoj Jarange
आज (14 सप्टेंबर) मुख्यमंत्री शिंदे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. त्यानंतर जरांगे यांनी मुख्यमंत्र्यांच्या हातून ज्यूस पिऊन आपलं उपोषण सोडलं आहे.
मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं असलं तरी त्यांचं आंदोलन सुरूच राहणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. सरसकट मराठा समाजाला (Maratha Reservation) कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
दरम्यान, या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मराठा समाजाचा (Maratha Reservation) हिताचा निर्णय मी घेईल. त्याचबरोबर मी मराठा समाजाला आरक्षण मिळवून देईल.
माझ्यासह हीच भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मराठा समाजाला न्याय मिळवून देण्याची क्षमता आहे.
त्यामुळे आपल्याला हे आंदोलन पुढे शांततेत सुरू ठेवायचं आहे. आमचं आंदोलन यशस्वी झालं आहे, हे मी आता म्हणणार नाही. जेव्हा सरकार आमच्या हातात कागदपत्र देईल, त्या दिवशी आमची ही लढाई यशस्वी ठरेल.”
महत्वाच्या बातम्या
- Sanjay Raut | राहुल नार्वेकरांनी घटनेशीद्रोह केलाय – संजय राऊत
- Maratha Reservation | आरक्षण घेतल्याशिवाय मी सोडणार नाही – मनोज जरांगे
- Uddhav Thackeray | मोदी काळात सनातन धर्माचे विकृतीकरण झालेय; ठाकरे गटाचं मोदी सरकारवर टीकास्त्र
- Deepak Kesarkar | बोलून मोकळ व्हायचं म्हणजे योग्य निर्णय घ्यायचा; व्हायरल व्हिडिओवर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया
- Vijay Wadettiwar | संभाजी भिडे उपोषण स्थळी राज्य सरकारची वकिली करायला गेले – विजय वडेट्टीवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now











