Share

Monsoon Session | खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला; सरकार विरोधात विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

🕒 1 min read Monsoon Session | मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे. आळंदी येथे माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. प्रकरणावरून विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं … Read more

Published On: 

🕒 1 min read

Monsoon Session | मुंबई: राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा आज सहावा दिवस आहे. आज दिवसाच्या सुरुवातीलाच विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.

आळंदी येथे माऊलींचा प्रस्थान सोहळा सुरू असताना वारकऱ्यांवर पोलिसांनी हल्ला केला असल्याची माहिती मिळाली होती. त्या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलं तापलं होतं. प्रकरणावरून विरोधकांनी आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं आहे.

Khokyancha dalla, Varkaryanvar halla

आज विधिमंडळाच्या (Monsoon Session) पायऱ्यांवर वारकऱ्यांवर झालेल्या हल्ल्यावरून विरोधक आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. यावेळी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर उपरणे, टोपी, टाळ, मृदुंग घेऊन राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘खोक्यांवर डल्ला, वारकऱ्यांवर हल्ला’ अशा घोषणा विरोधकांनी यावेळी दिल्या आहे. या आंदोलनावरून आज विधिमंडळात काय होईल? यावर सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विरोधकांचं हे आंदोलन (Monsoon Session) सुरू असताना शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देखील राज्य सरकार विरोधात आंदोलन केलं आहे.

कर्जत-जामखेडच्या तरुणांना रोजगार मिळालाच पाहिजे, असं रोहित पवार यांनी यावेळी म्हटलं आहे. पाऊस असो वा इतर कोणताही अडथळा जोपर्यंत माझ्या मतदारसंघातील युवकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत मी हलणार नाही, असं देखील रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

“माझ्या मतदारसंघातील #MIDC चा प्रश्न आश्वासन देऊनही सरकार मार्गी लावत नाही. दबावाच्या राजकारणाला बळी पडणाऱ्या सरकारचा धिक्कार! आता अखेरचा पर्याय! #उपोषण”, असं रोहित पवार यांनी ट्विट करत (Monsoon Session) म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही