WTC Final | टीम इंडियाच्या चिंतेत वाढ! WTC फायनल पूर्वी संघातील ‘हा’ स्टार खेळाडू जखमी

WTC Final | टीम महाराष्ट्र देशा: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (World Test Championship) चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. हा सामना इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर 7 जून पासून खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या चिंतेत वाढ झाली आहे. WTC फायनल पूर्वी भारतीय संघाचा स्टार फलंदाज जखमी झाला आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (Royal Challengers Bangalore) आणि गुजरात टायटन्स (Gujarat Titans) यांच्यामध्ये आयपीएल 2023 चा 70 वा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये गुजरातने आरसीबीचा 6 गडी राखून पराभव केला. या सामन्यानंतर भारतीय संघासाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. या सामन्यामध्ये भारतीय संघातील स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) जखमी झाला आहे.

गुजरात आणि आरसीबी यांचा सामना सुरू असताना क्षेत्ररक्षण करताना विराट कोहलीच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यानंतर तो मैदानातून बाहेर गेला आणि परत आलाच नाही. WTC फायनलपूर्वी (WTC Final) कोहलीच्या दुखापतीमुळे भारतीय संघाच्या अडचणी वाढणार आहे.

आरसीबीचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी कोहलीच्या दुखापतीबद्दल माहिती दिली. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना ते म्हणाले, “कोहलीच्या गुडघ्याला किरकोळ दुखापत झाली आहे. त्यामध्ये मला काही गंभीर वाटत नाही. त्याला फलंदाजी व्यतिरिक्त क्षेत्ररक्षणातही आपले महत्त्वाचे योगदान द्यायचे आहे. त्याची दुखापत फारशी गंभीर नाही.”

महत्वाच्या बातम्या

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.