Share

मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघात १०५ अंतिम उमेदवार

मुंबई –  मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ साठी काल उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर अंतिम १०५ उमेदवार आहेत, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी दिली. उमेदवारी अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी १२ जणांनी माघार घेतली. मुंबई शहर जिल्ह्यातील दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे.

धारावी मतदारसंघातून ०३, वरळी मतदारसंघातून ०२, भायखळा मतदारसंघातून ०५ तर कुलाबा मतदारसंघातून ०२ जणांनी अर्ज मागे घेतले.

भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४ चा कार्यक्रम जाहीर केला आहे. मुंबई शहर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांसाठी दि. २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान होणार आहे. दिनांक 23 नोव्हेंबर 2024 रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू असून निवडणूक पारदर्शक व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरीता आचारसंहितेची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येत आहे.

मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांच्याकडून निवडणूक कामाचा आढावा घेतल्यानंतर मतदान केंद्रांचे विकेंद्रीकरण आणि सुसूत्रीकरण करण्यात आले आहे.  एका मतदान केंद्राच्या ठिकाणी १० पेक्षा जास्त केंद्रे असल्यास ते जवळच्या ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. सुसूत्रीकरणानंतर मतदान केंद्रांमध्ये झालेल्या बदलाबाबत मतदारांना प्रसारमाध्यम, समाजमाध्यमाद्वारे माहिती देण्यात आली आहे. यासोबत मतदान केंद्रांची माहिती असलेल्या ‘क्यूआर कोड’सह संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांची स्वाक्षरी असलेले पत्र प्रत्येक मतदारांच्या घरी जावून देण्यात येत आहेत.

मतदानाच्या दिवशी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी पिण्याचे पाणी,  स्वच्छतागृह, रांगांमध्ये आसन व्यवस्था, तसेच गर्दी झाल्यास मतदारांकरीता प्रतिक्षा कक्ष इत्यादी किमान निश्चित सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

व्होटर हेल्पलाईन ॲप (Voter helpline App) – मतदारांना आपले नाव मतदार यादीत तपासता येईल व नवीन मतदार नोंदणी या ॲपद्वारे करता येईल.

केवायसी ॲप (KYC App) – उमेदवारांबाबत माहिती या ॲपवर उपलब्ध होऊ शकेल

सी व्हिजील (Cvigil) ॲपच्या मदतीने आचारसंहिता उल्लंघन संदर्भातील तक्रार मतदारांना करता येते. या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.

मतदार यादीत तुमचं नाव आहे की, नाही हे पाहण्यासाठी https://voters.eci.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी तथा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकारी संजय यादव यांनी केले. मुंबई शहर जिल्हा प्रशासनातर्फे क्यूआर कोड ठिकठिकाणी प्रदर्शित करण्यात आले असून त्या माध्यमातूनही नागरिकांना मतदार यादीत आपले नाव तपासता येणार आहे,  असे श्री. यादव यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या – 

मुंबई –  मुंबई शहर जिल्ह्यातील धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहिम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या दहा विधानसभा मतदारसंघांमध्ये …

पुढे वाचा

Press Release

Join WhatsApp

Join Now