Sushma Andhare | मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली होती. सुप्रिया सुळे यांच्या आंदोलनाच्या इशाऱ्यावर टीका करताना ‘बारामतीचा खासदार बदलावा लागेल’, अशी टीका निलेश राणे यांनी केली होती. त्यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेंनी (Sushma Andhare) ट्वीट करत राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.
Nilesh Rane Criticize on Supriya Sule
“या ठिकाणी ६ पैकी २ आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री राहिले आहेत. शरद पवार स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. एवढं असून जर आंदोलन करावं लागतं, तर बारामतीचे खासदारच बदलावे लागतील”, असे निलेश राणे म्हणाले आहेत.
बारामती लोकसभा – खासदार सुप्रिया सुळे
६ पैकी २ आमदार – NCP
अजित पवार अनेक वेळा पालकमंत्री
पवार साहेब स्वतः बारामतीचे किंम जॉन्ग
स्थानिक सर्व बॉडी – NCP
एवढं असून जर आंदोलन करावं लागतं तर बारामती चे खासदारच बदलावे लागतील. https://t.co/vm9ujfJ4En
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) March 11, 2023
सुषमा अंधारेंचा निलेश राणेंना खोचक टोला
“प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून, हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात भाजप अन् राज्यात ईडी सरकार आले. तरीही शिवसेनाभवनच्या समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल, तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे. त्यामुळे ते बदलावेच लागेल नाही का?”, असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. सुषमा अंधारे यांनी निलेश राणेंच्या ट्विटला रिट्वीट करत निलेश राणेंना खोचक टोला लगावला आहे.
प्रिय निलू बाळा, तू अत्यंत कळकळीने लिहिलेस म्हणून,
हिंदुत्ववादी आहोत म्हणत केंद्रात bjp अन् राज्यात EDसरकार आले. तरीही जर सेनाभवन समोर हिंदुत्वासाठी आक्रोशमोर्चा काढावा लागत असेल तर याचा अर्थ विद्यमान सरकार हे हिंदुत्वविरोधी आहे तेव्हा ते बदलावीच लागेल नाही का?@ShivsenaUBTComm https://t.co/MeJEtn8Aza— SushmaTai Andhare (@andharesushama) March 11, 2023
महत्त्वाच्या बातम्या-
- Pragya Singh Thakur | “विदेशी महिलेचा मुलगा देशभक्त असूच शकत नाही, गांधीना देशाबाहेर हाकला”; साध्वी प्रज्ञांसिंहचं वादग्रस्त वक्तव्य
- Sheetal Mhatre | “..मग चारित्र्यहनन करणं हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार?”; ‘त्या’ व्हिडीओबाबत शीतल म्हात्रेंची पोलिसांत तक्रार
- Kirit Somaiya | “तोतऱ्याने तुमच्या बायकोचे बंगले कुठे गायब केले?”; किरीट सोमय्यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका
- Nana Patole | “भाजपमध्ये काय सगळे दुधाने धुतलेले लोक आहेत का?”; नाना पटोलेंचा संतप्त सवाल
- Sadanand Kadam | रामदास कदमांचे बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक