Sheetal Mhatre | “..मग चारित्र्यहनन करणं हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार?”; ‘त्या’ व्हिडीओबाबत शीतल म्हात्रेंची पोलिसांत तक्रार

Sheetal Mhatre | मुंबई : राज्याच्या राजकारणात महिला पुरुषांच्या बरोबरी पुढे आलेल्या आपण पाहत आहोत. राजकारणामध्ये सध्या एकमेकांवर टीका करण्याची पातळी घसरली आहे. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Shettal Mhatre) यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याबाबत शीतल म्हात्रे यांनी आपला व्हिडीओ मॉर्फ करून व्हायरल केल्याचा आरोप केला आहे.

दहिसर पोलीस स्टेशनला शीतल म्हात्रे यांनी तक्रार नोंदवली आहे. यानंतर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या व्हिडीओवर स्वतः शीतल म्हात्रे यांनी ट्वीट करत भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्वीवमध्ये त्यांनी विरोधकांना चांगलेच खडेबोलही सुनावले आहेत.

स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसलं की,…

“एखादा पुरुष राजकारणात स्त्रिला कसं वागवतो याचे मला अनुभव आले आहेत. मी माझ्या आत्मसन्मानासाठी माझी जीव आणि करियर सर्व पणाला लावलं. आज त्याच स्त्रीबद्दल बोलण्यासारखं काही नसलं की असे प्रकार केले जातात”, असं शीतल म्हात्रे यांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.

Sheetal Mhatre comment on Uddhav Thackeray Group

“राजकारणामधील महिलेसंदर्भात बोलण्यासारखे काही नसले तर तिचे चारित्र्यहनन करणे हेच उद्ध्वस्त गटाचे संस्कार आहेत? मातोश्री नावाच्या फेसबूक पेजवरुन एका स्त्री संदर्भात असा मॉर्फ व्हिडीओ अपलोड करताना बाळासाहेबांचे संस्कार नाही का आठवले?”, असंही शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.

“भावा-बहिणीचं नातं असलेल्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो”

“आज हे व्हिडीओ व्हायरल करणारे कोण आहेत हे सर्वांना माहिती आहे. विरोधक एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात एखाद्या स्त्रिला अशा पद्धतीने बदनाम करू शकतात. भावा-बहिणीचं नातं असलेल्या एखाद्या स्त्री-पुरुषाला समाज विकृत नजरेने बघतो आहे. यामागे कुणाचं डोकं आहे आणि कोण करतंय याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे,” असे शीतल म्हात्रे म्हणाल्या आहेत.

रात्री उशिरा पोलीस तक्रार दाखल

“मीही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सुन आहे आणि कुणाची तरी बायको आहे. यांच्याही घरात आई-बहिणी असतील. असं असूनही एखाद्या महिलेसंदर्भात एवढ्या खालच्या स्तरावर जाऊन बोललं जातंय, खोटे व्हिडीओ टाकले जात आहेत. विरोधक एका महिलेबाबत असं वागू शकतात यावर बोलण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. यांच्यावर कठोर कारवाई होणारच आहे. आम्ही त्याविरोधात दहिसर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यासाठी आलो आहोत. रात्रीचे पावणेतीन वाजले आहेत आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी इथं आहेत. व्हिडीओ पोस्ट करणारे बरेचजण युवासेनेचे कार्यकर्ते आहेत,” असा आरोप शीतल म्हात्रेंनी केला आहे.

शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेंचा व्हायरल व्हिडीओ

https://twitter.com/i/status/1634767394953658368

महत्त्वाच्या बातम्या-

कृपया जाहिरातींना अनुमती द्या

तुम्ही जाहिरात ब्लॉकर वापरत आहात असे दिसते. आमच्या साइटला आर्थिक मदत मिळवण्यासाठी आम्ही जाहिरातींवर अवलंबून असतो. कृपया जाहिरातींना अनुमती द्या.