🕒 1 min read
पुणे – पुण्यातील वैष्णवी हगवणे या विवाहित तरुणीने १६ मे रोजी गळफास लावून आत्महत्या केल्यानं संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. वैष्णवीने सासरच्या छळाला कंटाळून टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप होत आहे. या प्रकरणात आता तपासाचा वेग वाढला असून, तिच्या सासऱ्याला मदत करणाऱ्या आणखी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
या आधी तिचा पती, सासू, सासरा, दीर आणि नणंद यांना अटक झाली होती. आता पोलिसांनी वैष्णवीचा फरार सासरा राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्या पाच व्यक्तींना अटक केली आहे. हे प्रकरण जितकं खोल जातंय, तितकंच ते गंभीर व राजकीय वळण घेत आहे.
Sushma Andhare Accuses Pune Police of Negligence
या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे ( Sushma Andhare ) यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांच्या मते, “वैष्णवीच्या शरीरावर १९ जखमा होत्या आणि त्या सर्व मृत्यूच्या दिवशीच झालेल्या होत्या. अशा स्थितीत तिच्या मृत्यूची नोंद ‘संशयास्पद’ अशी केली पाहिजे होती. पण पोलिसांनी ती ‘आत्महत्या’ म्हणून नोंदवली, यामागे दबाव असण्याची शक्यता आहे.”
तसेच त्यांनी निलेश चव्हाण या व्यक्तीवर आधीच गुन्हे नोंद असल्याचा उल्लेख करत, त्याला राजकीय वरदहस्तामुळे शस्त्र परवाना मिळाल्याचा गंभीर आरोप केला. महिला आयोगाकडून देखील निवडक तक्रारी घेतल्या जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रकरणात रोज नवे खुलासे होत असून, राजकीय हस्तक्षेप, पोलिसांची शिथिलता आणि महिलांविरोधातील वाढता छळ हे सर्व मुद्दे ऐरणीवर आले आहेत.
📌 महत्वाच्या बातम्या
- “सासू करते काळी जादू!” – विवाहितेचा धक्कादायक आरोप, आत्महत्येचा प्रयत्न, हगवणे कनेक्शन पुन्हा चर्चेत
- आणखी एक विवाहितेचा आत्महत्येचा प्रयत्न, ‘हगवणे कनेक्शन’ पुन्हा चर्चेत
- भाजप नेत्याचे हायवेवर गर्लफ्रेंडसोबत अश्लील गैरकृत्य; शिक्षा मात्र देखरेख करणाऱ्या ३ कर्मचाऱ्यांना!









