Dhananjay Munde । राजकीय वर्तुळातून अजित पवार गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील राजकीय दबाव वाढत चालला आहे, असे बोलले जात आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
दरम्यान, कालच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली. अशातच आता यावर भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे.
“धनंजय मुंडे यांच्याबाबत अजित पवार निर्णय घेतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचा याच्याशी काय संबंध? कारण ते आमच्या पक्षाचे नाहीत. त्यांच्याच पक्षाचे आमदार मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही हा अजित पवारांचा प्रश्न आहे,” अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे.
Suresh Dhas on Dhananjay Munde
पुढे ते म्हणाले की, “ज्यांनी-ज्यांनी वाल्मिक कराड (Walmik Karad) ला फरार होण्यास मदत केली होती, त्यासंबंधीचे पुरावे, कागदपत्रं आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिले आहेत. त्या सर्वांना सहआरोपी करावे. नंतर परळी नगर पालिकेचं स्पेशल ऑडिट झाले पाहिजे. एका एका व्यक्तीच्या नावावर तब्बल 46-46 कोटी रुपयांची बिले घेण्यात आली आहेत. विष्णू चाटे सारख्या आरोपीच्या नावावर तर 46 कोटी रुपये घेतले आहे,” असा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या :