Share

IPL 2025 Schedule । यंदा आयपीएलची सुरुवात कधी होणार? अध्यक्षांनी दिली महत्त्वाची माहिती

The IPL 2025 schedule will be announced soon, said IPL President Arun Dhumal.

by MHD

Published On: 

IPL 2025 Schedule will start from March 21, informed by Arun Dhumal

🕒 1 min read

IPL 2025 Schedule । प्रत्येक संघाच्या चाहत्यांना आपल्या संघाने यंदाच्या वर्षी IPL चे विजेतेपद जिंकावे असे वाटत आहे. चाहते आतापासूनच आयपीएलची (IPL) आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच आता आयपीएलचे अध्यक्ष अरूण धुमाळ (Arun Dhumal) यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

यंदाचा आयपीएलचा हा हंगाम 21 मार्चपासून सुरू होईल. लवकरच आयपीएल 2025 चे वेळापत्रक (IPL 2025 Schedule) जाहीर होईल. नियमात कोणताही बदल होणार नाही. (IPL 2025 Schedule New Dates) नियम पूर्वीप्रमाणेच असतील. फक्त दोन ते तीन सामने धर्मशळा क्रिकेट मैदानावर खेळवले जाणार आहेत,” असा दावा धुमाळ यांनी केला आहे. (IPL 2025 Timetable)

हा आयपीएलचा (IPL 2025) 18 वा हंगाम असेल. मेगा लिलाव 18 व्या हंगामाच्या आधी गतवर्षी दुबईमध्ये झाला होता. या मेगा लिलावात, आयपीएल लिलावाच्या इतिहासातील रिषभ पंत हा आतापर्यंतचा सर्वात महाग खेळाडू ठरला आहे. त्याला लखनौ सुपर जायंट्सने 27 कोटी रुपयांना विकत घेतले आहे.

तसेच मागील वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून आयपीएल विजेतेपद जिंकणार्‍या श्रेयस अय्यर याला पंजाब किंग्जने 26.75 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. त्यामुळे इतर खेळाडूंपेक्षा या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीकडे संघांसह चाहत्यांचे विशेष लक्ष असणार आहे.

IPL Schedule in 2025

दरम्यान, आयपीएल ही जगातील मोठी क्रिकेट लीग असून आयपीएलची मीडिया व्हॅल्यू 6.2 बिलियन युएसडी डॉलर्स म्हणजेच सुमारे 48000 कोटी इतकी आहे. त्याशिवाय जगातील सर्वात मोठ्या स्पोर्ट्स लीगमध्ये नॅशनल फुटबॉल लीगनंतरची ही दुसऱ्या क्रमांकाची लीग आहे.

IPL 2025 संघ आणि कर्णधार | IPL 2025 Schedule

IPL वेळापत्रक 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या संघांची आणि कर्णधारांची यादी खाली दिली आहे.

SR क्र आयपीएल संघ आयपीएल संघाचा कर्णधार
1 चेन्नई सुपर किंग्स (CSK) ऋतुराज गायकवाड
2 मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्या ( बदलू शकतो )
3 राजस्थान रॉयल्स संजू सॅमसन
4 कोलकाता नाईट्स रायडर्स
5 पंजाब किंग्ज श्रेयस अय्यर
6 सनरायझर्स हैदराबाद पॅट कमिन्स
7 दिल्ली कॅपिटल्स सिकंदर रजा
8 रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
9 लखनौ सुपर जायंट्स रिषभ पंत
10 गुजरात टायटन्स रशीद खान

आयपीएल 2025 ची ठिकाणे | IPL 2025 Venues | Tata IPL 2025 Teams Home Ground 

शहर स्टेडियम होम टीम
मुंबई वानखेडे स्टेडियम मुंबई इंडियन्स (MI)
चेन्नई एमए चिदंबरम स्टेडियम चेन्नई सुपर किंग्स (CSK)
कोलकाता ईडन गार्डन्स कोलकाता नाइट रायडर्स (KKR)
दिल्ली अरुण जेटली स्टेडियम दिल्ली कॅपिटल्स (DC)
बेंगळुरू एम. चिन्नास्वामी स्टेडियम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)
हैदराबाद राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सनरायझर्स हैदराबाद (SRH)
अहमदाबाद नरेंद्र मोदी स्टेडियम गुजरात टायटन्स
जयपूर सवाई मानसिंग स्टेडियम राजस्थान रॉयल्स (RR)
मोहाली पीसीए स्टेडियम पंजाब किंग्स (PBKS)
लखनौ एकना क्रिकेट स्टेडियम लखनौ सुपर जायंट्स (LSG)

महत्त्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या