Share

Sheetal Mhatre | “आमदारांच्या जीवावर खासदार झालेल्या राऊतांनी राजीनामा द्यावा”- शीतल म्हात्रे

🕒 1 min read Sheetal Mhatre | मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी सेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेलं. या पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे … Read more

Published On: 

🕒 1 min read

Sheetal Mhatre | मुंबई : शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेचे दोन गट पडले. त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरे गट आणि शिंदे गटाने एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत हातमिळवणी केली आणि नवं सरकार स्थापन केलं. त्यांनी सेनेच्या 40 आमदारांना आपल्यासोबत नेलं. या पार्श्वभूमीवरुन शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वरळीतून लढवून दाखवण्याचं चॅलेंज दिलं होतं. ते शिंदे गटाने स्विकारुन शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी निवडणूक लढवून दाखवू त्यासाठी एकनाथ शिंदेंची गरज नाही आम्हीच तुम्हाला हरवू, असा विश्वास व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज वरळीत सभा होणार आहेत. यावरुन आमदार आदित्य ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं आहे. “कितीही नेते येऊदे वरळीतील गल्लीगल्लीत फिरायला लावणार, तरी विजय आपलाच होणार”, असं म्हणत आदित्या ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आव्हान दिलं आहे. त्यावरुन आता शीतल म्हात्रे यांनी आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला उत्तर देताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना प्रतिआव्हान केले आहे.

शीतल म्हात्रे यांचे ट्वीट (Sheetal Mhatre)

राजीनामा देण्याचीच जर चर्चा सुरु आहे तर महाज्ञानी आणि स्वाभिमानी राऊतांनी आमदारांच्या (राऊतांच्या भाषेत- रेडा, दगड, गिधाड इ.) जीवावर मिळालेल्या खासदारकीचा राजीनामा द्यावा!!! आणि जमलंच तर परत खासदार होऊन दाखवावे!!! आहे हिंमत??, असे ट्वीट शिंदे गटाच्या शीतल म्हात्रे यांनी केले आहे. शीतल म्हात्रे यांच्या आव्हानाला संजय राऊत काय उत्तर देतात हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे.

“वरळीतून लढायला जमत नव्हतं तर…” (Aaditya Thackeray’s Statement in Nashik Rally)

आदित्य ठाकरेंच्या संवाद यात्रेचा आज दुसरा दिवस आहे. नाशिकच्या चांदोरी येथे आयोजित सभेत ते बोलत होते. “पाठीवर वार करुन विरोधी पक्षात बसवण्यात आलं. वरळीतून लढणं जमत नव्हतं, तर मला फोन करुन सांगायचं, मी ठाण्यात येऊन लढलो असतो. मला मोठ्या सभा घ्यायच्या नाहीत, मला अशाच छोट्या सभा घ्यायच्या आहेत. मोठ्या सभा घेतल्या तर नागरिकांमध्ये जाता येत नाही. गद्दार आणि मुख्यमंत्री सभा घेतात, तेव्हा खोके वाटले जातात. पण, तरीही खुर्च्या रिकाम्या असतात,” असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या