Share

कुंभमेळा नाशिकमध्ये, पण ‘मलई’ गुजरातला?; ५० हजार कोटींच्या कामांवर संजय राऊतांनी फोडला ‘बॉम्ब’!

Sanjay Raut alleges Rs 50,000 crore Nashik Kumbh Mela contracts awarded to Gujarat contractors, criticizing BJP for corruption and environmental damage.

Published On: 

Sanjay Raut criticized Narendra modi over donald trump announcement of tariffs on india.

नाशिक– देवाच्या दारात सुद्धा ‘टक्केवारी’ चालते का? असा प्रश्न पडावा, असा गंभीर आणि धक्कादायक आरोप आता नाशिकच्या वेशीवर झालाय. नाशिकमध्ये होऊ घातलेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने कोट्यवधींचा चुराडा होणार आहे, पण यातील खरी ‘मलई’ नक्की कोणाला मिळणार? यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी नाशिकमधील सभेत भाजपवर तोफ डागली. “कुंभमेळ्यासाठी ५० हजार कोटींची कामं काढण्यात आली आहेत, पण दुर्दैवाने ही सगळी कंत्राटं गुजरातच्या ठेकेदारांना देण्यात आली आहेत,” असा सनसनाटी दावा राऊतांनी केलाय. इतकंच नाही, तर ज्या ठेकेदाराला हे काम मिळालंय, तोच भाजपच्या निवडणुकीचा सगळा खर्च उचलणार असल्याची माहिती असल्याचं सांगत राऊतांनी एकच खळबळ उडवून दिली.

Sanjay Raut Nashik Speech

प्रकरण फक्त पैशांपुरतं मर्यादित नाही. नाशिकच्या पर्यावरणावरही घाला घातल्याचा आरोप यावेळी झाला. अयोध्येच्या धर्मध्वजावर झाडांचं चिन्ह मिरवणारे, इकडे नाशिकच्या तपोवनात मात्र २ हजार झाडांची कत्तल करत आहेत, असा घणाघात राऊतांनी केला. देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) नाशिक ‘दत्तक’ घेतलं होतं, पण त्यांनी शहराची अवस्था सावत्र भावापेक्षाही वाईट केली, असं म्हणत राऊतांनी नाशिकमधील वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्याकडेही लक्ष वेधलं.

याच मुद्द्यावर मनसे प्रमुख राज ठाकरेंनीही (Raj Thackeray) भाजपचा ‘छुपा अजेंडा’ उघडा पाडला. “कुंभमेळ्याच्या नावाखाली झाडं तोडायची आणि साधू-संत गेल्यानंतर ती मोकळी जागा उद्योगपतींच्या घशात घालायची, हे यांचं आधीच ठरलेलं असतं,” असा थेट आरोप राज यांनी केला. त्यामुळे नाशिकमध्ये आता ‘ठाकरे बंधू’ विरुद्ध ‘भाजप’ असा सामना येत्या काळात चांगलाच रंगणार, हे नक्की!

📌 महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही