मुंबई, दि. १६ ऑगस्ट २०२४ | Nana Patole Vs Amit Shah Narendra Modi ATM
भारतीय जनता पक्षाकडे भ्रष्टाचाराने कमावलेला पैसा आहे. दिल्लीत बसलेले दोन नेते महाराष्ट्राला एटीएम समजून लुटत आहेत. महाराष्ट्राला कंगाल करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपा युतीचा पराभव करून मोदीशाहांचे हे एटीएम बंद करू आणि महाराष्ट्राचा पैसा महाराष्ट्रातील जनतेसाठीच वापरू, असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.
यावेळी बोलताना नाना पटोले पुढे म्हणाले की, लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेत्याला महत्वाचे स्थान आहे, सत्तापक्ष व विरोधपक्ष ही लोकशाहीची दोन चाके आहेत पण स्वातंत्र्य दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांना योग्य स्थान दिले नाही, हा लोकशाहीचा खून आहे. भाजपामध्ये सत्तेची घमेंड व गर्व अजून आहे, विधानसभेच्या निवडणुकीत ही अहंकारी प्रवृत्ती सत्तेतून बाहेर काढली पाहिजे.
बाळासाहेब थोरात यावेळी म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या १० वर्षांच्या मनमानीला जनतेने उत्तर दिलेले आहे. महाराष्ट्राचा आवाज दिल्लीत वाढला आहे, महाराष्ट्राने संसदेत वाघिणी पाठवल्या आहेत, या महिल्या खासदार भाजपा सरकारला धारेवर धरत आहेत. लोकसभेतील राहुल गांधी यांच्या पहिल्याच भाषणाने ५६ इंचाच्या छातीला धडकी भरली. लोकसभा निवडणुकीत बहुमत जाताच नरेंद्र मोदी यांना धर्मनिरिपेक्षतेची आठवण झाली आहे.
लोकसभेच्या विजयाने महाराष्ट्रात चैतन्याचे वातावरण आहे, राज्यातील बेकायदेशीर सरकार घरी बसवण्याची जनतेची भावना आहे. ‘पन्नास खोके, एकदम ओके’ हे जनता अजून विसरलेली नाही. महायुती सरकारचे घोटाळे उघड करताना महाविकास आघाडी सरकारने पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली हे सांगा. मविआच्या चांगल्या कामांची माहिती जनतेला सांगा, असे थोरात म्हणाले.
प्रदेश कार्याध्यक्ष नसीम खान यावेळी म्हणाले की, महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार प्रचंड वाढला आहे. दर वाढवून टेंडर द्यायचे व त्यातून टक्केवारी घेऊन लुट सुरु आहे. मुंबईत आता कुकर घोटाळा सुरु झाला आहे, ६०० रुपयांचे कुकर अडीच हजार रुपयांना विकत घेऊन प्रत्येक वार्डात ४० ते ५० हजार कुकर वाटले जात आहेत. भाजपने वफ्क बोर्डाच्या जमिनीचा मुद्दा पुढे आणला आहे परंतु हिंदू धर्माच्या देवस्थानची जमीन असो वा मुस्लीम धर्माच्या देवस्थानच्या जमिनींना हात लावाल तर ते सहन केले जाणार नाही, असा इशारा नसीम खान यांनी दिला.
खा. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेची सध्या चर्चा सुरु आहे पण महिलांसाठी महालक्ष्मी योजना ही सर्वात आधी कर्नाटक व तेलंगणात काँग्रेस सरकारने आणली आहे. महायुती सरकार बहिणींना नाही तर मतांसाठी पैसे देत आहे पण हे पैसे परत घेण्याची धमकीही देत आहेत. लाडकी बहीण तर आता आली लाडका मित्र योजना तर अडीच वर्षांपासून सुरु आहे. मुंबईतील सर्व महत्वाच्या जागा या लाडक्या मित्राला दिल्या जात आहेत. मविआची सत्ता आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेच्या दोन वर्षांच्या कारभाराची श्वेतपत्रिका काढू असे गायकवाड म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या
- महंत रामगिरी महाराजांच्या वक्तव्याने छत्रपती संभाजीनगरात तणाव; शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त
- सुप्रियांच्या लाडक्या भावाने रंग बदलला, ते पिंक झाले पण रंग तर सरडा बदलतो
- १ ७ ऑगस्ट रोजी दवाखाने राहणार बंद; डॉक्टरांचा देशव्यापी संप