१ ७ ऑगस्ट रोजी दवाखाने राहणार बंद; डॉक्टरांचा देशव्यापी संप
IMA Doctor announces 24-hour nationwide strike
मुंबई । IMA Doctor Strike । १ ७ ऑगस्ट सकाळी ६ वाजल्यापासून दुसऱ्या दिवशी ( १ ८ ऑगस्ट ) सकाळी ६ वाजेपर्यंत सर्व दवाखाने, क्लिनिक्स, ओपीडीच्या सेवा बंद ठेवण्यात येणार आहेत. मात्र, अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असल्याचं आयएमएने स्पष्ट केलं आहे.
कोलकात्यात आर जी कर मेडिकल कॉलेजात महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन मेडिकल असोसिएशनने ( IMA ) १ ७ ऑगस्ट रोजी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच आयएमएने रुग्णालये सेफ झोन म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.
संपात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत, परंतु २ ४ तास बाह्यरुग्ण विभाग (OPD) सेवा बंद राहणार आहे. आयसीयू, अपघात विभाग, अत्यावश्यक शस्रक्रिया आणि प्रसूतीसेवाही सुरू ठेवण्यात येणार आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा कायदा करण्याच्या मागणीसाठी देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदा आणला पाहिजे. जवळपास २ ५ राज्यांमध्ये डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी कायदे असले, तरी ते त्याची अंमबजावणी होताना दिसत नाही. हॉस्पिटलमध्ये ५ ० टक्के महिला डॉक्टर असतील तर महिलांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असल्याचं आयएमएने सांगितले.
IMA Doctor announces 24-hour nationwide strike
The Indian Medical Association has announced a 24-hour nationwide withdrawal of non-emergency services from 6 am on Saturday to protest against the alleged rape and murder of a trainee woman doctor at the state-run R G Kar Medical College and Hospital in Kolkata and the subsequent vandalism at the facility.
The medical body in a statement said that essential services will be maintained and casualty wards will remain operational. The IMA said that out-patient departments (OPD) will not function and elective surgeries will not be conducted.
महत्वाच्या बातम्या