🕒 1 min read
मुंबई टेक टीम । सध्या बाजारात टाटा फायबर, जिओ फायबर आणि एअरटेल फायबर या तीन मुख्य कंपन्या इंटरनेट सेवा देत आहेत. या लेखात आपण या तिन्ही कंपनी देत असलेल्या सेवा बद्दल विस्ताराने माहिती देणार आहोत.
प्लॅन बददल | Tata Fiber vs Airtel Fiber Vs Jio Fiber
इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या या प्रमुख कंपन्याच्या १०० MBPS च्या प्लॅन बाबत माहिती. आणि आलेला अनुभव खाली सविस्तर.
| कंपनी | Tata Fiber | Jio Fiber | Airtel Fiber |
| प्लॅन | ८०० + GST | ८९९ + GST | ८९९ + GST |
| स्पीड | १०० MBPS Unlimited | १०० MBPS Unlimited | १ ० ० MBPS Unlimited |
| OTT | नाही | आहे ( OTT + Live Tv ) | आहे ( OTT + DTH ) |
| एकूण किमंत | ९४४ | 1060 | 1060 |
| मदत सेवा | अतिशय चांगली | खराब | अतिशय खराब |
| सेवा दर्जा | उत्तम | छान | वाईट |
टाटा फायबर, जिओ फायबर आणि एअरटेल फायबर यांच्या कंपनीचा इंटरनेट सेवांचा अनुभव घेण्यासाठी आम्ही यांची सेवा घेतली आणि आम्हाला आलेल्या अनुभवाबद्दल येथे सविस्तर लिहीत आहोत.
टाटा फायबर | Tata Fiber
सर्व प्रथम आम्ही टाटा फायबर कंपनी सोबत संपर्क करून इंटरनेट सेवा घेतली. २८२८ रुपयांमध्ये ९० दिवसाच्या वैधता सह १०० MBPS Unlimited हा प्लॅन घेतला. कंपनी सोबत संपर्क केल्यानंतर अवघ्या २ तासांत ( कामाच्या वेळी ) कंपनी कडून जोडणी साठी फोन आला. त्यानुसार पत्ता आणि इतर माहिती दिल्या नंतर इंटरनेट सेवा १ दिवसामध्ये सुरु झाली. २८२८ रुपयांच्या प्लॅनमध्ये Wi-Fi Router & Installation मोफत दिले जाते.
अनुभव – टाटा फायबरचे इंटरनेट सेवा सुरु झाल्यानंतर १०० MBPS स्पीड मिळत होता. तर मोबाइलवर ३० ते ४० MBPS आणि 5G नेटवर्कला ९० MBPS स्पीड मिळाला. आणि 2BHK प्लॅट मध्ये संपूर्ण एरिया मध्ये व्यवस्थित इंटरनेट सेवा मिळली. शिवाय ग्राहक तक्रार नियोजन केंद्र अतिशय उत्तम वाटली आणि समस्या निराकरण करणारे व्यक्ती व्यवस्थित वाटले. ग्राहक तक्रार नियोजन केंद्राला कॉल करताना अडचण आली नाही. महत्चाचे, कमी वेळेत कॉल हा ग्राहक तक्रार नियोजन केंद्राला जोडला जातो.
टीप – सेवा चांगली नाही वाटल्यास रीफंड मिळण्यासाठी ७ दिवस लागतात आणि पूर्ण रीफंड दिला जातो.
जिओ फायबर | Jio Fiber
जिओ एअर-फायबरने नवीन २१२१ रुपयांमध्ये ९० दिवसाच्या वैधता सह ३० MBPS Unlimited हा प्लॅन लाँच केला आहे. पण हा प्लॅन घेताना ४८ तासांत किंवा प्रामुख्याने तुम्हाला जोडणी दिली जाईल असे सांगण्यात येते. परंतु प्रत्यक्षात तुम्ही ऍडव्हान्स बुकिंग केल्यानंतर ही तुम्हाला कनेक्शन मिळत नाही. भरलेले पैसे परत मिळवण्यासाठी कुठलाही पर्याय नाही. शिवाय ग्राहक तक्रार नियोजन केंद्राला कॉल लागत नाही. तुम्ही जर जिओ फायबर घेणार असाल तर तुम्हाला या सर्व अडचणींचा सामना करावा लागेल. २१२१ रुपयांच्या प्लॅनमध्ये Wi-Fi Router, STB & Installation मोफत दिले जाते.
अनुभव – Jio Fiber सेवा सुरु झाल्यानंतर ३० MBPS स्पीड मिळतो. तर मोबाइलवर १० MBPS आणि 5G नेटवर्कला २० MBPS स्पीड मिळाला. 2BHK प्लॅट मध्ये संपूर्ण एरिया मध्ये व्यवस्थित इंटरनेट सेवा मिळली. पण सेवा सुरु होईपर्यत तुमचा मानसिक छळ होतो. ग्राहक तक्रार नियोजन केंद्राला कॉल लागत नाही. या मुख्य समस्या आहेत.
टीप – सेवा चांगली नाही वाटल्यास रीफंड मिळण्यासाठी ३० दिवस लागतात.
एअरटेल फायबर | Airtel Fiber
एअरटेल फायबर ३३०० रुपयांमध्ये ४० MBPS सह १३५ दिवसांची वैधता मिळते. शिवाय OTT + DTH सेवा तुम्हाला मिळते. यामध्ये तुम्हाला HotStar चे ‘प्रीमियम‘ सब्सक्रिप्शन सांगतात परंतु तुम्हाला HotStar ‘सुपर’चे सब्सक्रिप्शन मिळते. सुरवातीलाच भारती एअरटेल तुमची फसवणूक करत असल्याचे लक्षात येते. इंटरनेट आणि DTH जोडणी सेवा १ दिवसांत होऊन कनेक्शन सुरु होते. ३३०० रुपयांच्या प्लॅनमध्ये Wi-Fi Router, STB & Installation मोफत दिले जाते.
अनुभव – Airtel Fiber चे इंटरनेट सेवा सुरु झाल्यानंतर ४० MBPS स्पीड मिळत होता. तर मोबाइलवर १० ते १ ५ MBPS आणि 5G नेटवर्क काम करत नसल्याचे दिसून आले. याबद्दल तंत्र सहाय्यकाला विचारले असता Auto switch होत असल्याचे सांगितले जाते. परंतु इंटरनेट स्पीड वाढला किंवा स्पीड मध्ये काहीच फरक दिसून आला नाही. तुम्ही 2BHK प्लॅट मध्ये एअरटेल फायबर घेत असाल तर संपूर्ण एरिया मध्ये इंटरनेट सेवा मिळत नाही. मोबाईल मध्ये इंटरनेट सारखे बंद-चालू होते. यावर विचारले असता आणखी १ हजार रुपये भरून वेगळे उपकरण घेण्याचा सल्ला दिला जातो. म्हणजेच इथेही तुमची फसवणूक झाल्याचे समजते.
DTH बॉक्स हा चांगला असून पण OTT अप्स चालवतांना तो हँग होतो. Youtube आणि इतर अप्स चालवताना खूप वेळा बफरचा सामना करावा लागतो. या सगळ्या समस्या तुम्ही SALES सहाय्यकाला सांगता तेव्हा तुम्ही १ ० दिवसात पूर्ण रीफंड घेऊ शकता असे सांगितले जाते, परंतु कंपनी कडून रीफंड देण्यास टाळाटाळ केली जाते. ३३०० रुपयांच्या प्लॅन मध्ये Installation मोफत असल्याचे सांगितले जाते परंतु रीफंड घेताना तुम्हाला त्याचे पैसे द्यावे लागतील असे सांगितले जाते. म्हणजे भारती एअरटेल कडून तुमची ३ वेळा फसवणूक होते.
३३०० प्लॅन निष्क्रिय करतांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. तुमच्याकडे एअरटेल चा मोबाईल क्रमांक नसेल तर कॉल लागत नाही. लागला तर सहाय्यकाला जोडण्या पर्यन्त खूप वेळ लागतो. निष्क्रिय करण्यास सांगितल्या नंतर सहाय्यकाकडून सुरवातीला टाळाटाळ होते, नंतर खूप वेळा नंतर तुमची कॅन्सल रिकवेस्ट स्वीकारली जाते. सहाय्यकाकडून तुम्ही जेवढ्या दिवस तुम्ही सेवा वापरली त्याचे पैसे कापले जातील असे सांगितले जाते. परंतु तुम्हाला इमेल मध्ये Installation चे पैसे भरावे लागतील असे सांगितले जाते. त्यामुळे तुमची इथे आर्थिकही फसवणूक होते.
Conclusion – Don’t buy Airtel Fiber
टीप – Airtel Fiber सेवा चांगली नाही वाटल्यास रीफंड मिळण्यासाठी ४५ दिवस लागतात शिवाय चेकने रीफंड मिळेल असे सांगितले जाते. म्हणजे ४५ दिवस + चेक येणे आणि क्लिअरिंग साठी १० दिवस. एकूण ५५ दिवसांत तुम्हाला पैसे मिळू शकतात.
टाटा, जिओ आणि एअरटेल फायबरची तक्रार करण्यासाठी माहिती
टाटा, जिओ की एअरटेल फायबरची तक्रार तुम्ही भारत सरकारच्या https://consumerhelpline.gov.in/ वेबसाईट वर करू शकता. किंवा 1800-11-4000 किंवा 1915 या क्रमकांवर फोन करून तक्रार नोंदवू शकता. इथेही तुमचे समाधान न झाल्यास कायदेशीर तक्रारीसाठी भारत सरकारच्या https://edaakhil.nic.in/ या वेबसाईट वर तक्रार नोंदवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
- राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नसेल, पण… मनोज जरांगे यांचं सडेतोड उत्तर
- “तुमचा नेता सुपारी घेतोय आणि तुम्ही…”, संजय राऊत यांचा राज ठाकरेंवर निशाणा
- कुटुंब फोडलं, पार्टी फोडली! देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व काय? – रोहित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












