Moto G05 Offer : कमी बजेटमध्ये उत्तम फीचर्स आणि बेस्ट बॅटरी तसेच जबरदस्त डिस्प्लेसह येणारा फोन तुम्ही शोधात असाल या बातमीमध्ये तुमचा फायदा होऊ शकते. नुकतंच भारतीय बाजारात मोटोरोलाने आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये बेस्ट फीचर्स देण्यात आले आहे.
कंपनीने बाजारात Moto G05 लाँच केला. या स्मार्टफोनमध्ये 6.67 -इंचाचा एचडी+ डिस्प्ले, मीडियाटेक हेलिओ जी81 एक्स्ट्रीम प्रोसेसर, 5200 एमएएच बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या फोन ची विक्री देखील भारतीय बाजारात सुरु करण्यात आली आहे. त्यामुळे कमी किमतीमध्ये नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Moto G05 तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते.
Moto G05 किंमत आणि ऑफर
कंपनीने Moto G05 फ्लिपकार्टवर लाँच केला आहे. Moto G05 ची 4जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेजची किंमत 6999 रुपये ठेवण्यात आली आहे. तुम्ही फोन प्लम रेड आणि फॉरेस्ट ग्रीन अशा दोन रंगांच्या पर्यायांमध्ये खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक क्रेडिट कार्ड वापरून हा फोन 5% कॅशबॅकसह खरेदी करता येईल.
Moto G05 Features
Moto G05 मध्ये 50MP चा मेन कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये पोर्ट्रेट मोड आणि ऑटो नाईट व्हिजन सारख्या फीचर्सचा देखील समावेश आहे. सेल्फीसाठी, तुम्हाला Moto G05 मध्ये 8MP चा सेल्फी कॅमेरा मिळणार आहे. तसेच या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ G 81 एक्स्ट्रीम प्रोसेसर आहे.
फोनमध्ये 4 जीबी हार्डवेअर आणि 8 जीबी व्हर्च्युअल रॅम आहे. ज्यामुळे फोनची एकूण रॅम 12 जीबी होते. याच बरोबर Moto G05 मध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5200mAh बॅटरी आहे. जे 2 दिवसांची बॅटरी लाईफ देते.
Moto G05 मध्ये अँड्रॉइड 15 आउट ऑफ द बॉक्स आहे. दोन वर्षांचे सुरक्षा अपडेट्स मिळण्याची पुष्टी झाली आहे. आणि मोटो जी05 फोनमध्ये डॉल्बी अॅटमॉससह ड्युअल स्टीरिओ स्पीकर्स,हाय-रिझोल्यूशन व्हाइस आहे.डस आणि पाण्यापासून संरक्षणासाठी हा फोन IP52 रेटिंगचा आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Mahakumbh 2025 : कोण आहेत नागा साधू? शाही स्नानापूर्वी करतात ‘हे’ 17 अलंकार, जाणून घ्या सर्वकाही…
- Mercedes Electric G Class Launched : दमदार फीचर्स अन् 473 किमी रेंजसह बाजारात आली मर्सिडीज इलेक्ट्रिक जी क्लास, किंमत फक्त…
- Mahindra XUV 3XO EV ‘या’ दिवशी होणार लाँच, क्लास फीचर्ससह Punch EV ला देणार टक्कर