गॅस बुकिंगसाठी कॉल लागत नाहीये? रांगेत उभे राहण्यापूर्वी हे ४ सोपे मार्ग जाणून घ्या, मिनिटांत होईल काम!

फोनवरून गॅस बुकिंग होत नसल्यास रांगेत उभे राहू नका. व्हॉट्सअॅप, मिस्ड कॉल आणि एसएमएसच्या मदतीने घरबसल्या झटपट गॅस सिलेंडर बुक करा.

Published On: 

LPG Cylinder Booking | LPG Cylinder Booking WhatsApp SMS Missed Call Methods |

LPG Cylinder Booking | सध्या अनेक ठिकाणी गॅस बुकिंगसाठी ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. फोनवरून बुकिंग होत नसल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये काहीशी खळबळ उडाली आहे.

असं असलं तरी, ग्राहकांना घाबरून जाण्याची कोणतीही गरज नाही. केवळ फोन कॉलवर अवलंबून न राहता तुम्ही इतर अत्यंत सोप्या पर्यायांचा वापर करू शकता. घरबसल्या अगदी काही सेकंदात तुमचं काम मार्गी लागू शकतं.

LPG Cylinder Booking : घरबसल्या या पर्यायांनी करा गॅस बुकिंग

सर्वात सोपा मार्ग म्हणजे व्हॉट्सअॅप. तुमच्या नोंदणीकृत क्रमांकावरून संबंधित कंपनीला मेसेज करा. इंडेन गॅससाठी ७५८८८८८८२४ या नंबरवर REFILL असा मेसेज पाठवा. एचपी गॅसचे ग्राहक ९२२२२०११२२ या नंबरवर Hi किंवा Book पाठवू शकतात. तर भारत गॅससाठी १८००२२४३४४ या नंबरवर मेसेज करता येईल.

याशिवाय मिस्ड कॉल देऊनही काम सोपे होते. इंडेनसाठी ८४५४९५५५५५ तर एचपीसाठी ९४९३६०२२२२ वर फक्त एक मिस्ड कॉल द्या. जर तुम्हाला एसएमएस करायचा असेल, तर इंडेनचे ग्राहक ७७१८९५५५५५ वर REFILL पाठवू शकतात.

भारत गॅससाठी ७७१५०१२३४५ वर LPG असा मेसेज करा. हे मेसेज नोंदणीकृत नंबरवरूनच पाठवणे बंधनकारक आहे. सध्या डिजिटल पेमेंटचा जमाना आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांचे अधिकृत अॅप किंवा उमंग अॅप वापरता येईल. पेटीएम, फोनपे किंवा अॅमेझॉन पे सारख्या प्लॅटफॉर्मवरूनही बुकिंग सहज करता येते.

सर्व करूनही गॅस वेळेवर आला नाही तर काय करायचे? अशा वेळी तुम्ही थेट तक्रार नोंदवू शकता. इंडेन आणि एचपी गॅससाठी १८००२३३३५५५ हा टोल फ्री क्रमांक आहे. भारत गॅसचे ग्राहक १८००२२४३४४ वर संपर्क साधू शकतात. सूत्रांनुसार, संबंधित गॅस कंपन्यांच्या वेबसाइट आणि सोशल मीडिया हँडलवरूनही ग्राहकांच्या तक्रारींचे वेगाने निवारण केले जात आहे.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही