मणिपूरनंतर आता मेघालय जळतंय! BSF जवानांवर जीवघेणा हल्ला, परिस्थिती बिघडल्याने थेट लष्कर तैनात

मेघालयच्या गारो हिल्समध्ये उसळलेल्या हिंसाचारात जमावाने थेट BSF जवानांवर हल्ला करत गाडी पेटवली आहे. परिस्थिती बिघडल्याने लष्कर तैनात करण्यात आले असून कर्फ्यू लागू झाला आहे.

Published On: 

मेघालयमध्ये हिंसाचार, पोलिसांचा बंदोबस्त आणि BSF जवानांवर झालेल्या हल्ल्याचे दृश्य

Meghalaya | ईशान्य भारतात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. मणिपूरमधील हिंसाचाराची धग शांत होत नाही तोच आता मेघालयातून एक अत्यंत हादरवणारी बातमी समोर आली आहे. तिथे परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली आहे की, चक्क सैन्याला पाचारण करण्याची वेळ आली आहे.

बुधवारी संध्याकाळी मेघालयच्या गारो हिल्स भागात समाजकंटकांनी थेट सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांवरच जीवघेणा हल्ला चढवला. या भयंकर हल्ल्यात अनेक जवान जखमी झाले असून, संतप्त जमावाने चक्क BSF च्या डीआयजींच्या ताफ्यातील एक गाडीही पेटवून दिली. भारत-बांग्लादेश सीमेजवळ एका गावातून बैठक आटोपून परतत असताना हा हल्ला झाला. सुदैवाने यात अधिकाऱ्यांना केवळ किरकोळ दुखापत झाली आहे.

गारो हिल्समध्ये उसळला हिंसाचार; Meghalaya Violence

गारो पर्वतीय स्वायत्त जिल्हा परिषदेच्या (GHADC) निवडणुकीवरून हा सर्व प्रकार सुरू झाला आहे. या निवडणुकीत बिगर गारो समुदायाच्या सहभागाला स्थानिकांचा तीव्र विरोध आहे. मंगळवारी चिबिनांग भागात झालेल्या हिंसक झडपांमध्ये जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी गोळीबार केला. यात दोघांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळेच, प्रशासनाने आता अत्यंत कठोर पावलं उचलली आहेत.

राज्यात वाढत्या [Meghalaya Violence] च्या पार्श्वभूमीवर आता थेट सैन्याच्या पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. यातील तीन तुकड्या तुरा तर दोन चिबिनांग भागात पाठवण्यात आल्या आहेत. असं असलं तरी, वाढता तणाव पाहता मुख्यमंत्री संगमा यांनी १० एप्रिलला होणारी निवडणूक तातडीने स्थगित करण्याची घोषणा केली आहे.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आणि अफवा रोखण्यासाठी गारो पर्वतीय क्षेत्रातील पाच जिल्ह्यांमध्ये इंटरनेट आणि मोबाईल सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. पश्चिम गारो हिल्सचे उपायुक्त व्ही. अग्रवाल यांच्या आदेशानुसार, जिल्ह्यात १३ मार्चच्या मध्यरात्रीपर्यंत कडक कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तसेच, संवेदनशील भागात अतिरिक्त सुरक्षा पथकं तैनात करण्यात आली आहेत.

📌 महत्वाच्या बातम्या

AI ASSISTANT

Ask Maharashtra Desha

आधी या वेबसाइटवरील उपलब्ध बातम्यांमधून उत्तर शोधले जाईल. माहिती अपुरी असल्यास वेबवरील अतिरिक्त स्रोत तपासले जातील.

500 अक्षरांपर्यंत
MHD News

सत्य, निष्पक्षता आणि नव्या दृष्टिकोनाची कास धरत, 'महाराष्ट्र देशा' प्रत्येक घटनेचं प्रामाणिक रिपोर्टिंग करत आले आहे. अचूक आणि वेगवान बातम्या लोकांपर्यंत पोहोचवणे हे आमचे ध्येय आहे.

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही