Maruti Suzuki e Vitara: ऑटो एक्स्पो 2025 मध्ये (Auto Expo 2025) देशाची सर्वात मोठी ऑटो कंपनी मारुती सुझकीने (Maruti Suzuki) आपली नवीन इलेक्ट्रिक कार ई विटारा (Maruti Suzuki e Vitara) सादर केली आहे. भारतात तयार करण्यात आलेली ई विटारा जपानमध्ये डिजाइन करण्यात आली असल्याची माहिती यावेळी कंपनीकडून देण्यात आली आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या कारमध्ये 18 इंच अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. मात्र भारतीय बाजारात ही दमदार इलेक्ट्रिक कार कधी लाँच होणार याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. ई विटाराची लांबी 4,275 मिमी, रुंदी 1800 मिमी आणि हाईट1635 मिमी आहे. त्याचा ग्राउंड क्लीयरन्स 180 मिमी आहे.
तर कारचा डॅशबोर्ड चांगला डिझाइन करण्यात आला आहे. याच बरोबर या कारमध्ये कंपनी 49 किलोवॅट आणि 61 किलोवॅटचे दोन बॅटरी पॅक देऊ शकते. ज्यामुळे इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये तब्बल 500 किमी रेंज देऊ शकते. तर ग्राहकांच्या सेफ्टीसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग्ज, लेव्हल 2 एडीएएस, इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक, ऑटो होल्ड, 3 ड्रायव्हिंग मोड्स (इको, नॉर्मल आणि स्पोर्ट), सिंगल झोन ऑटो क्लायमेट कंट्रोल, वायरलेस फोन चार्जर आणि व्हेंटिलेटेड सीट्स अशी दमदार फीचर्स देण्यात आले आहे.
ई विटारा पेट्रोल विटारापेक्षा थोडी वेगळी असू शकते. माहितीनुसार, ई विटारा हार्टेक्ट ई-प्लॅटफॉर्मवर तयार करण्यात येत आहे. त्यामुळे पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत यामध्ये काही बदल दिसण्याची शक्यता आहे. याच बरोबर या कारमध्ये 18-इंच अलॉय व्हील्स असणार आहे आणि या कारमध्ये ट्विन स्क्रीन लेआउट आहे आणि एक नवीन ड्राइव्ह सिलेक्टर देखील कंपनीकडून देण्यात येणार आहे.
Maruti Suzuki e Vitara Price
तर दुसरीकडे या कारमध्ये कंपनी ‘ALLGRIP-e’ नावाची इलेक्ट्रिक 4WD सिस्टीम देणार आहे. या सिस्टीमच्या मदतीने ही कार ऑफ-रोडवर सहजपणे चालवता येणार आहे. तसेच बाजारात सुरु असणाऱ्या चर्चांनुसार या कारची किंमत भारतीय बाजारात 17-20 लाख रुपये असू शकते.
महत्वाच्या बातम्या :