Union Budget 2025 : आर्थिक वर्ष पुढील काही दिवसात संपणार असून 1 फेब्रुवारी रोजी देशाचा नवीन आर्थिक बजेट (Union Budget 2025) अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) संसदेत मांडणार आहे. त्यामुळे आपल्या देशात असे अनेकजण आहे जे वर्षाच्या शेवटी शेवटी कर वाचवण्यासाठी गुंतवणूक करत असतात. जर तुम्ही देखील कर वाचवण्यासाठी गुंतवणूक शोधत असाल तर तुम्ही काही सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात. या लेखात जाणून घ्या तुमच्यासाठी कोणती योजना योग्य ठरू शकते.
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीम (ELSS)
या योजनेत तुम्ही गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत 1.5 लाख रुपयांपर्यंतची सूट प्राप्त करू शकतात. या फंडांचा लॉक-इन कालावधी तीन वर्षांचा असून यामध्ये तुम्हाला जबरदस्त परतावा मिळू शकते. या योजनेत तुम्ही 500 रुपयांपासून गुंतवणूक करू शकता आणि याला कमाल मर्यादा नाही.
राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम (NPS)
राष्ट्रीय पेन्शन सिस्टीम योजना तुम्हाला फक्त कर वाचवण्यास मदत करत नाही तर चांगला परतावा देखील देते. तुम्ही या योजनेच्या मदतीने निवृत्तीनंतरची प्लॅनींग देखील करू शकतात. या योजनेत तुम्ही जर वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत त्यात गुंतवणूक करत राहिलात तर तुम्ही रकमेचा काही भाग काढू शकता आणि उर्वरित रक्कम दरमहा पेन्शनप्रमाणे मिळवू शकता. एनपीएसमधील गुंतवणुकीवर कलम 80 सीसीडी (1बी) अंतर्गत 50,000 रुपयांची अतिरिक्त वजावट मिळते, तर कलम 80सी अंतर्गत 1.5 लाख रुपयांची वजावट मिळते.
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP)
जर तुमच्याकडे कोणताही विमा नसेल तर तुमच्यासाठी ही योजना देखील बेस्ट आहे. या योजनेच्या मदतीने तुम्ही कर वाचवून चांगला परतावा प्राप्त करू शकतात. या योजनेचा लॉक-इन कालावधी 5 वर्षे आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे युलिप योजनेअंतर्गत गुंतवणूक, परतावा आणि पैसे काढणे हे सर्व करमुक्त आहे. जर तुम्ही 5 वर्षे गुंतवणूक करत राहिलात तर तुम्हाला कलम 80 सी अंतर्गत जास्तीत जास्त 1.5 लाख रुपयांची वजावट मिळू शकते.
ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS)
ही योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी आहे. एससीएसएस अंतर्गत तुम्हाला वार्षिक 8.2% व्याज मिळते. जर तुम्ही त्यात गुंतवणूक केली तर तुम्हाला कलम 80C अंतर्गत कर सूट मिळते. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त 30 लाख रुपये गुंतवू शकता.
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजेच पीपीएफ ही देखील या योजनांपैकी एक आहे. यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही कर देखील वाचवू शकता. या योजनेत केलेली गुंतवणूक कलम 80C अंतर्गत करमुक्त आहे. एवढेच नाही तर त्याचे व्याज आणि परिपक्वता रक्कम देखील करमुक्त आहे.
महत्वाच्या बातम्या :