Tata Nexon Offer: देशात विक्रीचे अनेक विक्रम मोडणारी टाटाची लोकप्रिय एसयूव्ही कार टाटा नेक्सॉन (Tata Nexon) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय बाजारात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपनीने नेक्सॉनच्या किमतींमध्ये बदल केला आहे. ज्याच्या फायदा घेत तुम्ही आता नेक्सॉन स्वस्तात खरेदी करू शकतात.
बाजारात नेक्सॉन फिअरलेस व्हेरिएंट आणि क्रिएटर व्हेरियंटची किंमत कमी करण्यात आली आहे. टाटा मोटर्सने एसयूव्ही (SUV) नेक्सॉनच्या MY 2025 क्रिएटिव्ह DCA 1.2 नवीन व्हेरियंटची किटम जाहीर केली आहे. नवीन किमतीनुसार या व्हेरियंटची किंमत 30,000 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आता या व्हेरियंटसाठी तुम्हाला फक्त 11,09,990 रुपये मोजावे लागणार आहे. याच बरोबर नेक्सॉन क्रिएटिव्ह+ पीएस डीसीए डीटी 1.2 ची किंमतही कमी झाली आहे.
या व्हेरियंटची किंमत 10 हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे . त्यामुळे आता हा व्हेरियंट खरेदी करण्यसाठी तुम्हाला 13,49,990 रुपये खर्च करावे लागणार आहे. तसेच कंपनीने Fearless+ PS DCA DK 1.2 ची किंमत 10,000 रुपयांनी कमी केली आहे. यानंतर या व्हेरिएंटची किंमत 12,89,990 रुपये झाली आहे.
Tata Nexon इंजिन आणि पॉवर
कंपनीने या कारमध्ये दमदार इंजिन दिले आहे. या कारमध्ये पॉवरट्रेन म्हणून 1.2-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन दिले आहे, ज्याची कमाल पॉवर 120bhp आहे. हे इंजिन 170 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करू शकते. या कारमध्ये 1.5-लिटर डिझेल इंजिन देखील आहे, जे जास्तीत जास्त 10 बीएचपी पॉवर निर्माण करते. याशिवाय, ते 260 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते.
Tata Nexon Features
जर आपण टाटा नेक्सॉनच्या इंटीरियरकडे पाहिले तर त्यात 10.25 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे. सुरक्षेसाठी, 6-एअरबॅग्ज, 360-डिग्री कॅमेरा, हिल असिस्ट आणि ABS तंत्रज्ञान सारखे फीचर्स दिले आहे. एसयूव्हीमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि वायरलेस फोन चार्जिंगसह 10.25-इंचाचा पूर्णपणे डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे.
पुढच्या सीट्स हाईट अॅडजस्टेबल आहेत, तर मनोरंजनासाठी JBL साउंड सिस्टम देण्यात आली आहे. टाटा नेक्सॉनला ग्लोबल एनसीएपीने 5 स्टार रेटिंग दिले आहे त्यामुळे भारतीय बाजारात या कारची मागणी जोराने वाढत चालली आहे.
महत्वाच्या बातम्या :