Gautam Gambhir: बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये (Border- Gavaskar Trophy) झालेल्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्मासह (Rohit Sharma) टीम इंडियाचे (Team India) हेड कोच गौतम गंभीरवर (Gautam Gambhir) देखील अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. यातच एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार बीसीसीआय (BCCI) चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर (Champions Trophy) गौतम गंभीरवर निर्णय घेणार आहे.
गेल्या वर्षी जुलैमध्ये गंभीरने पदभार स्वीकारल्यापासून भारतीय संघाने काही खास कामगिरी केलेली नाही. भारताला श्रीलंकेत, ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या मालिकेत पराभव स्वीकारावा लागला आहे. तर घराच्या मैदानात न्यूझीलंड देखील पराभव झाल्याने गौतम गंभीरवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, जर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली नाही तर गौतम गंभीरला हटवण्याबाबत बीसीसीआय निर्णय घेऊ शकतो. सध्या गंभीरचा करार 2027 च्या विश्वचषकापर्यंत आहे. तर दुसरीकडे बीसीसीआय आणि गौतम गंभीरमध्ये काही मुद्यावर एकमत नसल्याची देखील माहिती समोर आली आहे.
तर दुसरीकडे अशी देखील माहिती समोर आली आहे की, गौतम गंभीरला भारतीय संघात इतक्या दिवसांपासून सुरु असणारी सुपरस्टार संस्कृती संपवायची आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान काही स्टार खेळाडूंनी हॉटेल्स आणि सरावाच्या वेळेबाबत ज्या पद्धतीने मागणी केली होती त्यावर गंभीर नाराज असल्याचे समजते.
Gautam Gambhir Update
तर गंभीरचा मॅनेजर ऑस्ट्रेलियात सर्वत्र सावलीसारखा संघासोबत असल्याने बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारीही नाराज आहेत. ‘राष्ट्रीय निवडकर्त्यांच्या गाडीत त्याचा पीए काय करत होता?’ त्यांना अनोळखी व्यक्तीच्या उपस्थितीत बोलताही येत नव्हते. त्याला अॅडलेडमधील बीसीसीआय हॉस्पिटॅलिटी बॉक्समध्ये कसे स्थान मिळाले? टीम सदस्यांसाठी राखीव असलेल्या या पंचतारांकित हॉटेल कॉम्प्लेक्समध्ये तो कसा नाश्ता करत होता? असे काही प्रश्न बीसीसीआयकडून उपस्थित करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Nargis Fakhri : बॉलिवूड गाण्यांबद्दल नर्गिस फाखरीने केला धक्कादायक खुलासा, म्हणाली, सेटवर लोक…
- Ligier Mini EV : स्वप्न होणार पूर्ण, अवघ्या 1 लाखात लाॅंच होणार 192 किमी रेंज देणारी ‘ही’ इलेक्ट्रिक कार
- National Turmeric Board: केंद्र सरकारचा मोठा निर्णय अन् शेतकऱ्यांना दिलासा, सुरु होणार राष्ट्रीय हळद मंडळ