🕒 1 min read
Renault Triber Offer : भारतीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून 7 सीटर कारची मागणी झपाट्याने वाढत चालली आहे . त्यामुळे एकापेक्षा एक मस्त मस्त फीचर्ससह येणाऱ्या 7 सीटर कार आता भारतीय बाजारात उपलब्ध झाल्या आहे. यातच जर तुम्ही देखील 7 सीटर कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
या बातमीनुसार बाजारात धुमाकूळ घालणाऱ्या ट्रायबर 7 सीटर कारवर तब्बल 55 हजारांची सूट मिळत आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना 30,000 रुपयांची रोख सूट, 15000 रुपयांची एक्सचेंज ऑफर आणि 10,000 रुपयांचा लॉयल्टी बेनिफिट मिळणार आहे. मात्र ही ऑफर फक्त 2024 च्या मॉडेलवर उपलब्ध आहे. भारतीय बाजारात ट्रायबरची किंमत 5.99 लाख रुपयांपासून सुरू होते.
Renault Triber इंजिन आणि पॉवर
कंपनीने या शानदार कारमध्ये 999 सीसी पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 72 पीएस पॉवर आणि 96 एनएम टॉर्क निर्माण करते. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सने सुसज्ज आहे. ते 5-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन किंवा -स्पीड एएमटीशी जोडलेले आहे. ते मॅन्युअलमध्ये प्रति लिटर 17.65 किमी आणि ऑटोमॅटिकमध्ये प्रति लिटर 14.83 किमी मायलेज देते.
Renault Triber Features
रेनॉल्ट ट्रायबरमध्ये 5+2 सीटिंग पर्याय उपलब्ध आहे. या कारमध्ये 8 इंचाची टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आहे जी अॅपल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटोशी कनेक्ट करता येते. मात्र या कारमध्ये बूट स्पेस दिलेली नाही. सुरक्षेसाठी या कारमध्ये ड्युअल एअरबॅग्ज, अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आणि EBD ची सुविधा देखील आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Tata Nexon खरेदीची सुवर्णसंधी, चक्क 30,000 रुपयांनी स्वस्त
- Union Budget 2025 : करदात्यांनो, कर वाचवण्याची शेवटची संधी, ‘या’ 5 योजनेत आजच करा गुंतवणूक
- Google Search Engine ला मोठा धक्का, चक्क बाजारातील हिस्सा 90% पेक्षा कमी झाला, ‘हे’ आहे कारण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now












