Share

महाविकास आघाडीत लवकरच बिघाडी होईल; एकनाथ शिंदेंची मोठी भविष्यवाणी

Eknath Shinde | ”महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तर स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या महाआघाडीत लवकरच बिघाडी होईल,

Published On: 

Eknath shinde

Eknath Shinde | महाराष्ट्र विधानसभा निवडणूक जाहीर होताच, सत्ताधारी आणि विरोधकात चांगलीच जुंपली आहे. नेते मंडळी आरोप करण्याची कुठलीच संधी सोडताना दिसत नाही आहेत.

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे, ते म्हणाले की, ”महायुतीमध्ये कोणताही वाद नाही. आम्ही एकत्रित निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. तर स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या महाआघाडीत लवकरच बिघाडी होईल, अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.

पुढे बोलताना शिंदे म्हणाले, ”राज्यात कुठेही बंडखोरी होणार नाही. महायुती समन्वयाने लढेल. आघाडीच्या गोठात चलबिचल असून ‘मला मुख्यमंत्री करा, मला मुख्यमंत्री करा’, असे बॅनर आणि पोस्टर गल्लीगल्लीत फिरत आहेत. त्यामुळे आघाडीतील चलबिचल दिसत आहे.

आघाडी ही स्वार्थासाठी झालेली आघाडी आहे. ती विचार सोडलेली आघाडी आहे. बाळासाहेबांचे विचार त्यागलेली आघाडी आहे आणि स्वतःच्या स्वार्थासाठी झालेल्या महाआघाडीत लवकरच बिघाडी होईल” अशी भविष्यवाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

विरोधकांना पराभव समोर दिसू लागला की त्याचे खापर ईव्हीएमवर, निवडणूक आयोगावर फोडतात हे दुर्दैवी असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील ढरे येथे आपल्या मूळ गावी ग्रामदैवताच्या दर्शनासाठी आले आहेत.

Mahavikas Aghadi Alliance break down Eknath Shinde

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha App Logo

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही